शिवपूजेतही याचे विशेष महत्त्व असून भगवान शिवाच्या तपश्चर्येतून उगवलेलं पवित्र फूल अशी समजूत आहे. ब्रह्मकमळ रात्री उमलते, त्यामुळे त्याचे उमलणे शुभआणि इच्छा पूर्ती करणारे मानले जाते. हे दुर्मीळ फूल घरात फुलले की देवाची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी श्रद्धा आहे. मात्र ब्रम्हकमळ ओळखणं देखील तितकंच महत्वाचं आहे.
असं म्हटलं जातं की घरात ब्रम्हकमळ उगवल्याने किंवा पूजेसाठी ब्रम्हकमळ वाहिल्याने मनोकामना पूर्ण होते. मात्र आपल्या घरी असलेलं फुल हे ब्रम्हकमळच आहे का की ब्रम्हकमळ सारखं दिसणारं वेगळं फूल आहे हे कसं ओळखायचं याबाबत ‘निसर्गमित्र फार्म’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे. लांबचक पानं असलेलं आणि एकाच वेळी आठ ते दहा पांढरी फुलं येतात तर ते ब्रम्हकमळ नव्हे. शहरातील लोकांचा ब्रम्हकमळाच्या बाबतीत मोठा गैरसमज असतो. तो म्हणजे आपल्याकडे असलेल्या झाडाला आठ ते दहा ब्रम्हकमळ आली आहेत पण ते ब्रम्हकमळ नसून मेक्सिकन निवडूंग आहे.
याच्या पानांना मुळं फुटतात आणि पुन्हा मातीत रुजल्यावर नवं झाड येतं. याला येणारी पांढरी फुलं ब्रम्हकमळ सारखी दिसतात पण ते ब्रम्हकमळ नाही. शहरातील बाजारात या मेस्किसन निवडूंगाचं फुल ब्रम्हकमळ म्हणून विकलं जातं आणि दिशाभूल केली जाते. या वनस्पतीला रात्री फुलं येतात या नवस्पतीच्या वेगनवेगळ्या प्रजाती आहेत. भारतात पांढऱ्या आणि लाल रंगाची फुलं असणारी निवडूंग दिसतात. यांचाच जुळा भाऊ म्हणजे ड्रायगन फ्रुट आहे.
हिमालयाच्या 10 हजार फुटाच्या वरती येतं. त्याला पाहिजे असलेलं पोषक हवामान हे हिमालयाच्या डोंगराळ भागात असल्याने ही फुलं सर्वात जास्त हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंडच्या वातावरपणात जास्त निरोगीरित्या वाढतात. खऱ्या ब्रम्हकमळ पांढऱ्या रंगाचं हे फूल दिसायला कोबीचसारखं दिसतं. ब्रम्हकमळ फुलतं तेव्हा त्याला प्रचंड सुगंध असतो. या फुलाच्या आतल्य़ा बीपासून लाह्या करतात आणि त्याचा प्रसाद केदारनाथला दिला जातो.
सर्वसाधारण ब्रम्हकमळ सहसा उष्णकटीबंधीय वातारणात येत नाहीत त्यामुळे आपल्या घरात असलेलं पांढऱ्या फुलाचं झाड हे ब्रम्हकमळ आहे की मेक्सिकन निवडूंग हे पाहावं. खरंतर मेक्सिकन निवडूंगाची पांढरी फुलं देखील तुमच्या बाल्कनीला सुंदर बनवतात त्यामुळे जरी ते ब्रम्हकमळ नसलं तरी बाल्कनीच्या सजावटीसाठी याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
Ans: बहुतेक वेळा नाही. शहरात लोक ज्या पांढऱ्या फुलांना ब्रह्मकमळ समजतात ते प्रत्यक्षात मेक्सिकन निवडूंग (Mexican Cactus/Epiphyllum) असते.
Ans: अजिबात नाही! ते ब्रह्मकमळ नसले तरी त्याची पांढरी, सुंदर, रात्री उमलणारी फुलं तुमच्या घराची किंवा बाल्कनीची शोभा वाढवतात.
Ans: ब्रह्मकमळ हे हिमालयीन प्रदेशात आढळणारे पवित्र आणि दुर्मीळ फूल आहे. पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णूंच्या नाभीतून उगवलेल्या कमळावर ब्रह्मदेव प्रकट झाले, ते कमळ म्हणजेच ब्रह्मकमळ असे मानले जाते.






