२६ जानेवारीला लहान मुलांच्या भाषणासाठी 'हे' प्रभावी मुद्दे, ५ मिनिटांचे भाषण ऐकून सारेच करतील कौतुक
देशभरात सगळीकडे २६ जानेवारी हा दिवस मोठ्या गर्वाने आणि आनंदाने साजरा केला जातो. हा दिवस संपूर्ण भारतासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारत देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला होता. तसेच २६ जानेवारीला जगातील सर्वात मोठे लिखित संविधान स्वीकारून भारताने लोकशाहीची एक नवीन सुरुवात केली होती. त्यानंतर प्रत्येक वर्षी २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच लहान मुलं भाषणातून देशप्रेम व्यक्त करतात. तसेच देशाला स्वातंत्र्य मिळावा म्हणून मोठ्या मोठ्या लोकांनी केलेल्या कार्याचा उजळा भाषणातून व्यक्त केला जातो. त्यामुळे हे काही प्रभावी मुद्दे लहान मुलांच्या भाषणात नक्कीच उपयोगी पडतील.(फोटो सौजन्य – istock)
Republic Day 2026: ७७ वा की ७८ वा? २०२६ च्या प्रजासत्ताक …
“आदरणीय प्राचार्य, शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आज आपण येथे ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जमलो आहोत. २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले आणि भारत खऱ्या अर्थाने ‘प्रजासत्ताक’ बनला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या या संविधानाने आपल्याला समानता आणि न्यायाचा अधिकार दिला. मित्रांनो, केवळ ध्वज फडकवणे म्हणजे देशभक्ती नव्हे, तर देशाच्या कायद्यांचे पालन करणे आणि एक प्रामाणिक नागरिक म्हणून जगणे हीच खरी देशसेवा आहे. आपण सर्वांनी देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची शपथ घेऊया. जय हिंद!”
आजचा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे. २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशात भारतीय संविधान लागू झाले आणि भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक देश म्हणून ओळखला जाऊ लागला.
आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या या संविधानाने प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या मूल्यांची हमी दिली आहे.आज आपण स्वातंत्र्याने श्वास घेत आहोत, यामागे असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आहे. महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, राजगुरू, चाफेकर बंधू आणि अनेक अज्ञात वीरांनी देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांचे ऋण आपण कधीही विसरू शकत नाही.
मित्रांनो, प्रजासत्ताक दिन केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नाही, तर जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला संविधानाचे पालन करणे, देशाच्या एकतेसाठी काम करणे, स्वच्छता राखणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि समाजात समता व सलोखा जपणे हे आपले कर्तव्य आहे.
शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा शाही सोहळा! राज्यपाल फडकवणार …
आदरणीय शिक्षकवृंद,
माझ्या प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आपण सर्वांना माझा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज आपण २६ जानेवारी हा खास दिवस साजरा करत आहोत. या दिवशी आपल्या भारत देशाचे संविधान लागू झाले. त्यामुळे भारत देशाला आपले नियम आणि कायदे मिळाले. आपला देश खूप सुंदर आहे. आपल्याला बोलण्याचे, शिकण्याचे आणि स्वप्ने पाहण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी खूप कष्ट घेतले.महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग यांसारख्या महान व्यक्तींमुळे आज आपण आनंदाने शाळेत येऊ शकतो.
मित्रांनो,
आपण चांगले विद्यार्थी बनले पाहिजे.
आई-वडील आणि शिक्षकांचा आदर केला पाहिजे.
आपला देश स्वच्छ ठेवला पाहिजे.
सगळ्यांशी प्रेमाने वागले पाहिजे.
चला तर मग,
आपण सर्वजण मिळून म्हणूया—
जय हिंद!
जय भारत!






