बदलत्या जीवनशैलीमुळे वयाच्या कोणत्याही वर्षी जाणवू लागतो. जसेजसे वय वाढत जाते तसाच गुडघे दुखीचा त्रास आणखीन वाढत जातो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. गुडघे दुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर प्रामुख्याने बसल्या जागवरून उठताना किंवा खाली बसताना जास्त त्रास जाणवतो. अनेकदा या वेदना अधिक तीव्र होऊन जातात. शरीरामध्ये असलेला पोषणाचा अभाव, गोष्टीशी टक्कर, वाकलेले पाय यामुळे गुडघे दुखीचा त्रास जाणवतो. गुडघे दुखी चालू झाल्यानंतर चालणे किंवा धावणे अशक्य होऊन जात. त्यामुळे गुडघे दुखीपासून आराम मिळवायचा असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. घरगुती उपाय करून गुडघे दुखी कमी होते. आम्ही आज तुम्हाला अशाच एका घरगुती रेसिपीबद्दल सांगणार आहोत. जिचा वापर आहारात केल्याने गुडघे दुखीवर आराम मिळेल. रोजच्या चहाप्रमाणे हर्बल चहा कसा बनवायचा याची रेसिपी जाणून घेऊया.
गुडघे दुखीवर आल्याचा चहा गुणकारी:
गुडघे दुखीपासून आराम मिळवायचा असेल तर आहारात आल्याच्या चहाचा समावेश करा. आल्याचा चहा दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध असतो. तसेच यामुळे गुडघे दुखीपासून आराम मिळतो. आल्याचा चहा बनवण्यासाठी एका टोपात अर्धा ग्लास पाणी घेऊन ते गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात आल्याचे तुकडे टाकून शिजवून घ्या. टोपातील पाणी अर्धे झाल्यानंतर गॅस बंद करा. चहा गाळून त्यात लिंबाचा रस आणि मध मिक्स करून थंड झाल्यावर हा चहा तुम्ही पिऊ शकता. यामुळे गुडघे दुखीवर आराम मिळेल.
[read_also content=”40 व्या वर्षीही दिसाल अधिक तरूण, व्हायरल कोरियन फेस मास्कमुळे पडेल सौंदर्यात भर https://www.navarashtra.com/lifestyle/look-younger-even-at-40-with-a-viral-korean-face-mask-to-boost-your-beauty-537376.html”]
गुडघे दुखीवर आराम मिळवण्यासाठी या महत्वाच्या टिप्स: