काय आहे नेमका फरक
बऱ्याचदा फूड अॅलर्जी आणि फूड इनटॉलरन्स ही एकच गोष्ट आहे असे समजले जाते. नक्की कोणत्या पदार्थांमुळे फूड अॅलर्जी आणि फूड इनटॉलरन्स होते अथवा यामधील फरक काय आहे याबाबत सामान्य माणसांना माहीतच नाहीये. तुम्हाला याबाबत गोष्टी माहीत आहेत का? आता तुम्ही म्हणाल की, फूड अॅलर्जी आणि फूड इनटॉलरन्स या दोन्हीमध्ये नक्की फरक काय आहे?
तर फूड अॅलर्जी आणि फूड इनटॉलरन्स या दोन्हीची लक्षणे, कारणं आणि यामुळे शरीरावर होणाऱ्या परिणामाची तीव्रता ही वेगवेगळी आहे. आता हे नक्की कसे ते आपण या लेखातून डॉ. आकाश शाह, कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट, न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स यांच्याकडून जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
फूड अॅलर्जी

फूड अॅलर्जी म्हणजे नेमके काय?
फूड अॅलर्जी रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित आहे. फूड अॅलर्जी असलेल्या एखाद्याने एखादा विशिष्ट पदार्थ खाल्ल्यास रोगप्रतिकार शक्तीला तो पदार्थ शरीराला हानिकारक आहे असे वाटते आणि अॅलर्जिक रिअॅक्शन सुरू होते. या रिअॅक्शन मुळे शरीरात इम्युनोग्लोबुलिन ई (IgE) नावाच्या अँटीबॉडीज तयार होऊन त्या शरीरामध्ये हीस्टामाइन्स आणि इतर रसायने सोडायला लागतात. या रसायनांमुळे अंगावर पुरळ येणे, सूज येणे श्वास घेण्यास त्रास होणे आणि ॲनाफिलेक्सिस, ज्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो म्हणून तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी लागते, अशी लक्षणे मध्यम ते तीव्र स्वरूपामध्ये जाणवतात.
कोणत्या पदार्थांची अॅलर्जी

कोणत्या पदार्थांनी अलर्जी होऊ शकते
अन्नपदार्थांच्या अॅलर्जीमध्ये सहसा, शेंगदाणे, ट्री नट, शेलफिश, मासे, दूध, अंडी, सोया आणि गहू, यासारख्या पदार्थांची अॅलर्जी असते. काही लक्षणे, अॅलर्जिक अन्न पदार्थ खाल्ल्यानंतर साधारणपणे काही मिनिटे ते काही तासांनंतर जाणवतात. अॅलर्जी असलेला पदार्थ अगदी थोड्या प्रमाणात जरी खाण्यात आला तरी रिअॅक्शन होऊ शकते, त्यामुळे असे पदार्थ अजिबात बंद करणे आणि फूड अॅलर्जीचा त्रास होत असलेल्या माणसाची व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक आहे.
हेदेखील वाचा – तासनतास ऑफिसमध्ये बसण्यामुळे होतोय Dead Butt Syndrome, डेस्क जॉबचा आरोग्यावर परिणाम
फूड इनटॉलरन्स
तर फूड इनटॉलरन्स, पचन संस्थेशी निगडीत नाही. तर, जेव्हा पचनसंस्था काही खाद्यपदार्थ योग्यरित्या पंचवू शकत नाही तेव्हा असे होते. हे एन्झाईमच्या कमतरता जसे की, लॅक्टोज इनटॉलरन्स मध्ये लॅक्टेसची कमतरता, किंवा इतर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सेन्सीटीव्हीटीज, यामुळे देखील असू शकते, फूड इनटॉलरन्स मध्ये होणारा त्रास हा अॅलर्जीच्या त्रासाइतका तीव्र नसतो आणि पचन संस्थेशी निगडीत असतो. यामध्ये गोळा येणे, गॅस, जुलाब, पोटदुखी आणि क्रॅम्पिंग यासारखे त्रास होतात.
कधी जाणवतात लक्षणे

साधारण लक्षणे कधी दिसू लागतात?
याची लक्षणे जाणवायला जास्त वेळ लागतो, साधारणपणे असे अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर काही तासाने त्रास जाणवतो. फूड इनटॉलरन्सचा होणारा त्रास हा फूड अॅलर्जीच्या त्रासासारखा नसतो तो पदार्थ किती प्रमाणात खाल्ला आहे त्यावर अवलंबून असतो, थोडक्यात जर असे पदार्थ थोड्या प्रमाणात खाण्यात आले तर लक्षणे जाणवत देखील नाहीत, मात्र जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्रास होतो.
महत्वाचे फरक

फूड अॅलर्जी आणि फूड इनटॉलरन्स फरक काय आहे
सर्वात महत्वाचा फरक रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित आहे. फूड अॅलर्जीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती ट्रिगर होते ज्याचा जीवाला धोका संभवतो, तर फूड इनटॉलरन्स मुळे पचनाचे त्रास होऊ शकतात ज्यामुळे सहसा जीवाला धोका उद्भवत नाही. लक्षणे दिसायला लागणारा वेळ आणि त्यांचा वेग यातही फरक आहे: अॅलर्जीमुळे होणारा त्रास हा पटकन होऊ लागतो आणि त्याचा परिणाम शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर होऊ शकतो, त्यामानाने फूड इनटॉलरन्स मुळे होणारा त्रास उशिरा जाणवतो आणि सामान्यतः पाचन अस्वस्थते पर्यंत मर्यादित असतो.
निदान आणि काळजी
फूड अॅलर्जीच्या निदानासाठी, रुग्णाचा इतिहास पाहणे, स्कीन प्रीक टेस्टस, रक्त तपासणी, IgE अँटीबॉडीजचे प्रमाण पाहणे आणि काही बाबतीत मेडिकल सुपरव्हिजन खाली ओरल फूड चॅलेंज, करावे लागते. फूड इनटॉलरन्स मध्ये त्रासदायक अन्न पदार्थ ओळखण्यासाठी एलिमिनेशन डाएटस आणि फूड डायरी यांची मदत घ्यावी लागते, त्याच बरोबर लॅक्टोज इनटॉलरन्स सारखा आजार असल्यास ब्रेथ टेस्टस करावी लागते.
हेदेखील वाचा – कर्करोग असलेल्या महिलांसाठी प्रजनन क्षमता संरक्षण, म्हणजे नेमके काय?
काय करावे

काय करायला हवे
फूड अॅलर्जीची काळजी घेण्यामध्ये अॅलर्जीन पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करावा लागतो आणि चुकून संपर्कात आल्यास, अनेकदा अँटीहिस्टामाइन्स आणि एपिनेफ्रिन ऑटो-इंजेक्टरसह त्यावर उपचार करायची तयारी ठेवावी. तर फूड इनटॉलरन्सची काळजी घेताना, त्रास देणारे पदार्थ कमी प्रमाणात खाणे/पिणे किंवा पूर्णपणे टाळणे आणि लॅक्टोज इनटॉलरन्स साठी लॅक्टेस सप्लीमेंट्स वापरणे. योग्यप्रकारे काळजी घेण्यासाठी आणि गंभीर परिणाम टाळण्यासाठी फूड अॅलर्जी आहे की इनटॉलरन्स हे समजून घेणेफार महत्वाचे असते. योग्य निदान आणि वैयक्तिक मार्गदर्शनासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा.






