कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ५ फळं
निरोगी राहण्यासाठी हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. यामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी महत्त्वाची भूमिका बजावते. LDL म्हणून ओळखले जाणारे खराब कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते, रक्तप्रवाहात अडथळा आणते आणि हृदयविकाराचा धोका वाढवते.
तुम्ही तुमच्या आहारात काही खास गोष्टींचा समावेश करून तुमचा LDL कमी करण्यात मदत करू शकता. यामध्ये काही जांभळ्या फळांचा समावेश आहे. ही फळे केवळ स्वादिष्टच नाहीत, तर अँथोसायनिन अँटीऑक्सिडंट्स नावाच्या अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहेत, जी एलडीएल कमी करण्यासाठी आणि चांगले कोलेस्ट्रॉल (एचडीएल) वाढवण्यासाठी उपयुक्त मानली जातात. येथे आम्ही तुम्हाला अशाच 5 फळांबद्दल सांगत आहोत. (फोटो सौजन्य – iStock)
जांभूळ
जांभळाचे कोलेस्ट्रॉलसाठी फायदे
जांभूळ हे एक हंगामी फळ आहे, जे केवळ स्वादिष्टच नाही तर पौष्टिकतेनेही परिपूर्ण आहे. यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते. याव्यतिरिक्त, जांभळामध्ये अँथोसायनिन्स देखील भरपूर असतात, जे एलडीएल कमी करण्यास मदत करतात. तसंच तुम्हाला डायबिटीससारखा आजार असेल तर त्यावरही याचा चांगला उपयोग होतो.
ब्लॅकबेरी
कोलेस्ट्रॉलसाठी ब्लॅकबेरी
ब्लॅकबेरी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक बेरी आहे. हे व्हिटॅमिन सी, फायबर आणि मँगनीजचा चांगला स्रोत आहे. याशिवाय, त्यात अँथोसायनिनदेखील आढळते, जे एलडीएल कमी करण्यास आणि एचडीएल वाढविण्यास मदत करते. यामुळे हृदयरोगाच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत मिळते
ब्लूबेरी
घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय
ब्लूबेरी त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखली जाते. हे व्हिटॅमिन सी आणि फायबरचादेखील चांगला स्रोत आहे. अभ्यासात सांगण्यात येते की नियमितपणे ब्लूबेरीचे सेवन केल्याने एलडीएल कमी होण्यास मदत होते.
अंजीर
बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अंजीर
अंजीर फायबर आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की अंजीर खाल्ल्याने एलडीएल कमी होण्यास आणि एचडीएल वाढण्यास मदत होते. याशिवाय अंजीर खाल्ल्याने पोट नियमित साफ राहाते आणि अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहता.
प्लम
प्लमच्या फळाचा वापर करून करा कोलेस्ट्रॉल कमी
प्लम हे एक गोड आणि रसाळ फळ आहे. हे व्हिटॅमिन सी, फायबर आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. याव्यतिरिक्त, प्लममध्ये अँथोसायनिन देखीलआढळते, याचा उपयोग LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी होतो आणि यामुळे नसांमध्ये कोलेस्ट्रॉल साठत नाही.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.
संदर्भ
https://mydoctor.kaiserpermanente.org/mas/news/how-purple-produce-can-help-lower-cholesterol-2061611
https://www.medicalnewstoday.com/articles/purple-foods
https://www.health.harvard.edu/heart-health/11-foods-that-can-help-lower-your-cholesterol