हृद्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी उपाशी पोटी करा 'या' पांढऱ्या पदार्थाचे सेवन
सर्वच स्वयंपाक घरामध्ये लसूण हा पदार्थ असतोच. रोजच्या आहारात लसणीचा वापर केला जातो. लसूण खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी लसूणचे सेवन केले जाते. यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात. आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी रोजच्या आहारात लसूणचा वापर करावा. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, पचनसंबंधित समस्या इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी लसूणचे सेवन करावे. लसूण शरीर आतून मजबूत करण्यासाठी मदत करते. (फोटो सौजन्य – iStock)
शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात, ज्यामुळे शरीराचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर हृदयाला ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्यामुळे हृदयाच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हृदयाचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी उपाशी पोटी लसूण खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी लसूण खाल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया निरोगी राहते. याशिवाय पचनासंबंधित सर्व समस्या दूर होतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहेत. हे विषारी घटक शरीरात तसेच साचून राहिल्यामुळे आरोग्य बिघडते. पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी लसूण खावी. लसूण खाल्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते.
लसूण खाल्यामुळे हृदयसंबंधित बऱ्याच समस्या दूर होतात. लसूण खाल्यामुळे रक्तवाहिन्यांची कडकपणा कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. लसूणमध्ये असलेले सल्फर संयुगे लाल रक्तपेशींना हायड्रोजन सल्फाइड वायूमध्ये रूपांतरित करतात ज्यामुळे शरीराचा रक्तप्रवाह सुधारतो. उच्च रक्तदाबाचा धोका वाढल्यानंतर शरीराचे कार्य बिघडते. अशावेळी लसूण खावा. उपाशी पोटी लसूण खाल्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते आणि शरीराचे कार्य सुधारते.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. पचनक्रिया बिघडल्यानंतर गॅस, ऍसिडिटी, अपचन इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी उपाशी पोटी लसूण खावा. लसूण खाल्यामुळे शरीराचे कार्य सुधारते आणि पचनाची समस्या उद्भवत नाही. लसूण खाल्यामुळे रक्त शुद्ध होते आणि मधुमेह, नैराश्य आणि कर्करोगाच्या पेशींपासून शरीराचे नुकसान होत नाही.
साथीचे आजार किंवा इतर अनेक कारणामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. अशावेळी शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी उपाशी पोटी लसूण खावा. यामध्ये अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म शरीरातील विषाणू आणि बॅक्टरीया नष्ट करते. नियमित लसूण खाल्यामुळे सर्दी, खोकला आणि साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव होतो. लसूण खाल्यामुळे वातावरणातील बदलांचा कोणताच परिणाम शरीरावर दिसून येत नाही.