फुफ्फुसांचा कर्करोग झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ही गंभीर लक्षणे
दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. वायू प्रदूषण वाढल्यामुळे अनेक लोक सर्दी, खोकल्याच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. शिवाय फटाक्यांच्या धुरामुळे दमा, अस्थमा, फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणात वाढ झाल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शिवाय वाढत्या प्रदूषणामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचे रुग्ण वाढले आहेत. दिल्लीमध्ये प्रदूषणात वाढ झाल्याने फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. दिल्लीसह इतर राज्यांमध्ये प्रदूषणात वाढ झाली आहे. हवेची गुणवत्ता खराब झाल्यामुळे अनेक आजार वाढले आहेत. तसेच गुरुवारी हवेची गुणवत्ता सुधारली आणि पण अजूनही हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. मात्र अजूनही राज्याच्या काही भागांमध्ये प्रदूषण कमी झालेले नाही.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटचे डॉ. राहुल भार्गव यांनी सांगितल्यानुसार, भारतामध्ये वायू प्रदूषणाची पातळी वाढली आहे. वायू प्रदूषणात वाढ झाल्यामुळे अनेक आजार वाढण्याची शक्यता असते. वायू प्रदूषणात वाढ झाल्यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. PM2.5 सारख्या दीर्घ प्रदूषणाची वाढ झाल्यामुळे फुफ्फुसाच्या ऊतींचे नुकसान होऊन कर्करोगाचा धोका वाढतो. तसेच भारतासह इतर ठिकाणी धूम्रपान न करणाऱ्या लोकांना फुफ्फुसांच्या कर्करोगाची लागण झाली आहे. हा आजार भारतामध्ये मागील १० वर्षांपासून दिसून येत आहे.
मेडिकल ऑन्कोलॉजीचे प्रमुख डॉ. अशोक गुप्ता यांनी सांगितल्यानुसार, धूम्रपान न करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा फुफ्फुसांचा कर्करोग आढळून आला आहे. तसेच हा ‘एडेनोकार्सिनोमा’ प्रकार असून, हा आजार फुफ्फुसांच्या बाहेरील भागात सुरु होतो. फुफ्फुसांचा कर्करोग झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र कालांतराने या आजाराची लक्षणे दिसू लागतात. फुफ्फुसांच्या कर्करोगाची लक्षणे उशिराने दिसून येतात.
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
अस्थमा आणि ऍलर्जीसारख्या आजारांची लागण झालेल्या रुग्णांमध्ये फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे तज्ज्ञांनी N95 मास्क घालण्याचा सल्ला दिला. फुफ्फुसांचा कर्करोग होऊ नये म्हणून आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. जेणेकरून हा आजार लवकर बरा होईल. शिवाय गंभीर आजारांपासून दूर राहण्यासाठी आहारात अँटिऑक्सिडंट्स समृद्ध आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे. शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाण्याचे सेवन करावे.