फोटो सौजन्य: iStock
आपल्याकडे अन्न हे पूर्णब्रह्म असे म्हंटले जाते. तसेच लहानपणापासून ताटातील अन्न वाया जाऊ देऊ नये असा सल्ला सुद्धा आपल्या थोरांकडून दिला जातो. खरंतर एखादा पदार्थ जेवढा स्वछतेने आणि प्रेमाने बनवला जातो तितकाच तो खायला रुचकर होतो. परंतु आज सर्रास पदार्थांमध्ये भेसळ केली जात आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण असे अनेक किळसवाणे व्हिडिओ बघतो ज्यात सर्रासपणे अन्नात भेसळ केली जाते. नुकतेच गाझियाबादमधील एका घरात धक्कादायक घटना घडली आहे. या घरातील मोलकरीण जेवण बनवताना चक्क लघवीचा वापर करायची. यामुळेच घरातील सदस्यांचे आरोग्य बिघडू लागले. यानंतर त्यांनी किचनमध्ये कॅमेरा लावला . यानंतर त्या मोलकरणीचा जेवणाच्या भांड्यात लघवी करतानाचा व्हिडिओ त्यांच्या हाती सापडला.
कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे की आधीच लिव्हरच्या समस्येमुळे त्रस्त होते. सुरवातीला त्यांना हे नॉर्मल वाटले परंतु वेळेनुसार त्यांच्या आरोग्यात कोणताच सुधार जाणवला नाही. यानंतर त्यांनी आपल्या घरातील किचनमध्ये कॅमेरा लावला. यानंतर त्यांना एक धक्कादायक व्हिडिओ हाती लागला. या व्हिडिओमध्ये त्यांची मोलकरीण रीना जेवणाच्या भाड्यात लघवी करून जेवण बनवताना दिसली आहे. यानंतर कुटुंबाने त्या मोलकरीणविरुद्ध कठोर पाऊले उचलली आहे.
लघवीमध्ये विषारी पदार्थ आढळतात, त्यात युरिया, क्षार आणि अमोनिया असते, जे पिण्यामुळे लिव्हरचे आजार, इलेक्ट्रोलाइट्सचा त्रास आणि किडनी खराब होऊ शकते. लघवीमध्ये बॅक्टेरिया देखील असते, ज्यामुळे तुमच्या शरीरात अँटीबायोटिक प्रतिरोधक बॅक्टेरिया प्रवेश करतात. परिणामी संसर्ग होण्याची शक्यता वाढते. लघवीमध्ये क्षाराचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरात डीहायड्रेशन होऊ शकते.
हे देखील वाचा: साखरेचा वापर न करता बनवा चविष्ट गुळाचा मालपुआ, वाचा सोपी रेसिपी
सध्या युरीन थेरपीबद्दल खूप बोलले जात आहे. यामध्ये औषधी किंवा कॉस्मेटिक उपचारांसाठी लघवी वापरली जातो. ही एक ऑप्शनल मेडिकल प्रोसेस आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या लघवीला त्वचेवर किंवा हिरड्यांवर लावून मालिश केली जाते. युरीन थेरपीबाबत आरोग्याशी संबंधित अनेक दावे केले जातात, मात्र याचे शास्त्रीय पुरावे अद्याप मिळालेले नाहीत.