पावसाळ्याच्या दिवसांमध्ये संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत कॉर्न चाट
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं काहींना काही गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. कांदाभजी, बटाटाभजी किंवा इतर चमचमीत पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये संध्याकाळच्या नाश्त्यासाठी कुरकुरीत कॉर्न चाट बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी वेळात घाईगडबडीमध्ये तुम्ही कॉर्न चाट बनवू शकता. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मक्याची कणीस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. मक्याचे दाणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. मक्याच्या दाण्यांमध्ये विटामिन ए, बी, ई, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे अनेक लोक संध्याकाळच्या वेळी बाहेर फिरायला गेल्यानंतर भाजलेले मक्याचे दाणे खातात. मक्यामध्ये असलेले विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स हे इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी मदत करतात. चला तर जाणून घेऊया कुरकुरीत कॉर्न चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
शिमला मिरची खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये भाजलेल्या शिमला मिरचीपासून बनवा चमचमीत चटणी