झटपट बनवा दुधी भोपळ्याची मसालेदार काप
लहान मुलांना डब्यात काय खायला द्यावं हा प्रश्न सर्वच पालकांना नेहमीच पडतो. अशावेळी मुलांना अनेकदा पालक बाहेरून विकत आणलेले पदार्थ किंवा सॉस देतात. पण सतत बाहेरचे आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाल्यामुळे लहान मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. लहान मुलांच्या वाढीसाठी त्यांना आहारात पालेभाज्या किंवा इतर फळ भाज्यांचे सेवन करण्यास द्यावे. पण पालेभाज्या किंवा भाज्या पाहिल्यानंतर सर्वच मुलं नाक मुरडतात. भाज्या खाण्यास नकार देतात. पण भाज्यांचे सेवन न केल्यामुळे मुलांच्या शरीराचा विकास होत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दुधी भोपळ्यची काप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेली दुधीची काप मुलं आवडीने खातील. चला तर जाणून घेऊया दुधीची मसालेदार काप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी 8 स्मूदी रेसिपी