उडीद डाळ, मुगाची डाळ, गव्हाचे सत्व आणि ओट्स वेगवेगळे करून कढईत छान भाजणीचा वास लागेपर्यंत भाजून घ्या.
सगळा सुकामेवा भुरकट रंग येण्यासाठी एकत्र भाजा. भाजून झाल्यावर हे सर्व थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. प्रत्येक घटक हा कमीत कमी ३-४ मिनिटे भाजला गेला पाहिजे.
ह्यातील मुग डाळ, उडीद डाळ, गव्हाचे सत्व, ओट्स, तीळ, नाचणी, आणि सोयाबीन मिक्सर मधून काढून घ्या. ह्यांची बारीक पूड होईल असे बघा. ह्या सर्वांचे पीठ एकजीव करा. कमीत कमी ५-६ मिनिटे मिक्सर मधून फिरवा म्हणजे पीठ बारीक होईल. जर पीठ मऊ नसेल तर गरजेएवढे बारीक करा.
हे मिश्रण रेफ्रिजरेटर मध्ये ठेवा. काही काळानंतर येणारा खवट वास टाळण्यासाठी फ्रीज मधेच राहू दया.
हे पीठ थोडे गरम दुध आणि गुळ एकत्र करून दिल्यास त्याची चव छान लागते आणि वासही छान येतो. यात वापरलेल्या घटकांमुळे बाळाला हे खायला देखील आवडेल.
Web Title: Make homemade protein powder for kids nrrd