रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवा हिरव्या वाटणातील मसाले भात
रात्रीच्या जेवणात कायमच डाळभात, भाजी चपाती खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. रात्रीच्या जेवणात अनेक घरांमध्ये कायमच दालखिचडी बनवली जाते. दालखिचडी बनवण्यासाठी अतिशय सोपी आहे. यासोबतच पचनासाठी सुद्धा अतिशय हलकी असते. राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कडधान्य आणि भाज्यांचा वापर करून मसालेभात बनवला जातो. मसालेभात आणि त्यासोबत दह्याची कोशिंबीर असा बेत जेवणात असेल तर चार घास जास्त जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हिरव्या वाटणातील मसालेभात बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या भातासोबत तुम्ही कोशिंबीर किंवा कैरीचे आंबट लोणचं खाऊ शकता. यामुळे पदार्थाची चव वाढते. चला तर जाणून घेऊया हिरव्या वाटणातील मसालेभात बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






