Leftover Dal Paratha Recipe : उरलेल्या डाळीपासून बनवलेले हे पराठे फक्त उरलेलं अन्नच वाया जाण्यापासून वाचवत नाहीत, तर चवदार आणि पोषक नाश्त्याचा पर्याय बनतात. पुढच्यावेळी डाळ उरली तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.
अनेक घरांमध्ये डाळ आवर्जून बनवली जाते, पण हिच डाळ शिळी झाली की तिला फेकून दिली जाते
या उरलेल्या डाळीपासून तुम्ही चवदार असे पराठे तयार करु शकता
उरलेल्या डाळीपासून तयार केलेले हे पदार्थ चविष्टच लागत नाही तर आरोग्यासाठी पाैष्टकही ठरतात
आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच काही ना काही उरलेले अन्न असते, आणि त्यातील एक सर्वसामान्य पदार्थ म्हणजे “डाळ”. डाळ पौष्टिक असते, प्रथिनांनी भरलेली असते आणि शरीराला ऊर्जा देते. पण अनेक वेळा आपण रात्री केलेली डाळ दुसऱ्या दिवशी खायची इच्छा नसते. अशावेळी ही उरलेली डाळ वापरून आपण एक स्वादिष्ट आणि झटपट बनणारा नाश्ता तयार करू शकतो, तो म्हणजे उरलेल्या डाळीचे पराठे. हे पराठे फक्त चविष्टच नाहीत तर पौष्टिक देखील आहेत. सकाळच्या नाश्त्यासाठी, डब्यातील पदार्थ म्हणून किंवा संध्याकाळच्या हलक्या जेवणासाठीही हे उत्तम पर्याय आहेत. उरलेल्या डाळीत आधीच मसाले असतात, त्यामुळे पराठ्याला खास चव येते. हे पराठे घरातील सर्वांनाच खुश करतील. चला तर मग पाहूया ही सोपी आणि झटपट रेसिपी.