(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा सध्या चर्चेत आहे. घटस्फोटाच्या अफवांमुळे ती अलिकडेच चर्चेत आली होती. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीताने गोविंदाचे ३० वर्षांच्या मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर आहे. स्वत: सुनीताने म्हटलं होतं. तिने घटस्फोटोसाठी अर्जही केला होता. पण नंतर दोघेही परत एकत्र आले. आता सुनीताने गोविंदाच्या अफेअरबद्दल विचारल्यावर सुनिताने उघडपणे सांगितले आहे.
सुनीता आहुजा यांनी पारस छाबराच्या पॉडकास्टमध्ये सर्व महिलांना पैसे कमवण्याचा आणि त्यांच्या पतींवर अवलंबून न राहण्याचा सल्ला दिला. ती म्हणाली, “व्ह्लॉगिंग केल्यानंतर चार महिन्यांत मला YouTube सिल्व्हर बटण मिळाले हे पाहून मला खूप बरे वाटते. एका महिलेने स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. स्वतःचे पैसे कमवण्यात एक वेगळाच आनंद असतो. तुमचा नवरा तुम्हाला पैसे देतो, पण तुम्ही दहा वेळा मागितल्यानंतर तो फक्त एकदाच देईल. तुमची कमाई तुमची आहे.”
‘भूल भुलैया ४’ मध्ये अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन दिसणार एकत्र? अनीस बज्मीने चित्रपटाबद्दल दिल्या अपडेट
सुनीता म्हणाली की तिला गोविंदाला मोठे घर मागायचे आहे. ती सध्या तिचा मुलगा यश आणि मुलगी टीनासोबत चार बेडरूमच्या घरात राहते. अभिनेता तिच्यासोबत राहत नाही. “हे घर आमच्यासाठी खूप लहान आहे. आणि या पॉडकास्टमध्ये, मी सांगू इच्छिते, ‘चिची, मला 5BHK खरेदी कर. नाहीतर, तुझे काय होते ते तुला दिसेल.'”
सुनीताने गोविंदाच्या अफेअरच्या अफवांवरही प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “मी हे ऐकल्याचे अनेक वेळा माध्यमांना सांगितले आहे. पण जोपर्यंत मी त्याला स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही किंवा रंगेहाथ पकडत नाही तोपर्यंत मी काहीही करू शकत नाही. मी एका मराठी अभिनेत्रीबद्दल ऐकले आहे.
सुनीता पुढे म्हणाली, ” हे सर्व करण्याचं वय नाहीये. गोविंदाने त्याची मुलगी आणि मुलगा यश यांच्या करिअरबद्दल विचार करावा. पण, मी अफवा देखील ऐकल्या आहेत. पण जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. मी मीडियालाही सांगितले आहे की मी नेहमीच खरं बोलेन कारम मी खोटं बोलत नाही.
गोविंदा व सुनीता आहुजा यांनी १९८७ मध्ये लग्न केलं. या जोडप्याला मुलगी टीना आणि मुलगा यशवर्धन ही दोन अपत्ये आहे. यशवर्धन लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.






