शरीराचे कमी झालेले वजन वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक मुगाचे सूप
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात होणाऱ्या छोट्या मोठ्या बदलांकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घ्यावी. सकाळच्या वेळी बऱ्याचदा नेमकं नाश्त्यामध्ये काय खावं? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं पडतात. इडली, डोसा किंवा कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही पचनास हलके असलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मुगाचे सूप बनवू शकता. मूग आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आहेत. यामध्ये असलेले कॅल्शियम, फायबर आणि इतर घटक शरीराला पोषण देतात. वाढलेले वजन कमी करताना मुगाचे आहारात सेवन करावे. चला तर जाणून घेऊया मुगाचे सूप बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळची पौष्टीक सुरुवात! मटकीचे घावन कधी खाल्ले आहेत का? चवीला अप्रतिम, घरचेही होतील खुश