सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा ज्वारीच्या पिठाच्या आंबोळ्या
सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय बनवावं? असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडत असतात. नाश्त्यामध्ये कांदापोहे, उपमा, शिरा, डोसा इत्यादी पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ज्वारीच्या पिठाच्या आंबोळ्या बनवू शकता. ज्वारी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. ज्वारीमध्ये आढळून येणारे गुणकारी घटक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. यामध्ये कॅल्शियम, जीवनसत्वे, प्रोटीन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. सकाळच्या नाश्ता नेहमीच हेल्दी आणि पोटभर करावा. यामुळे दुपारच्या वेळी लवकर भूक लागत नाही. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहाने जातो. चला तर जाणून घेऊया ज्वारीच्या पिठाच्या आंबोळ्या बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
कडक उन्हाळ्यात ५ मिनिटांमध्ये घरी बनवा गोव्यातील पारंपरिक पद्धतीमध्ये फुटी कढी, नोट करून घ्या रेसिपी