Raigad News: अलिबाग तालुक्यात निवडणूक रणसंग्राम! कुठे तिरंगी, कुठे चौरंगी लढत; राजकीय गणितं बदलणार
Ajit Pawar Death: पहाटेचा शपथविधी ते पक्षफूट… अजित पवारांच्या आयुष्यातील 5 निर्णायक क्षण
दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होती. तोपर्यंत कोण अर्ज मागे घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. शिवसेना आणि भाजपमध्ये युती व्हावी अशी तालुक्यातील दोन्ही पक्षाच्या नेत्यांची इच्छा होती. यासाठी वरीष्ठ पातळीपासून स्थानिक पातळीवरदेखील शेवटपर्यंत चर्चा सुरू होती. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणासाठी आलेले मंत्री भरत गोगावले यांच्याशी देखील याबाबत चर्चा झाल्याचे समजते. परंतु या चर्चेला यश आले नाही. त्यामुळे युती फिसकटल्याचे पहायला मिळाले. (फोटो सौजन्य – AI Created)
रायगड जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये युती झाल्याचे सांगितले जात होते. परंतु अनेक जागांवर दोन्ही पक्षांनी दावा सांगितल्याने युतीमध्ये बाधा आली. अलिबागमध्ये शहापूर मतदार संघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समोरासमोर आहेत. तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अमित नाईक यांच्यासमोर भाजपने सुप्रभात पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यात युती होवू शकली नाही.
अलिबाग तालुक्यात जिल्हा परीषदेचे एकूण सात मतदार संघ आहेत. या सात जागांसाठी एकूण २१ उमेदवार रिंगणात उरले आहेत. त्यापैकी दोन मतदार संघात सरळ, तीन मतदार संघात तिरंगी आणि दोन मतदार संघात चौरंगी लढत होत आहे. चेंढरे मध्ये शेकाप विरूदध शिवसेना असा सरळ सामना आहे तर आवासमध्ये शिवसेना विरूदध काँग्रेस अशी लढत आहे. थळ कावीर आणि चौलमध्ये तिरंगी लढत होणार आहे. आंबेपूर आणि शहापूर मतदार संघात चौरंगी सामना रंगणार आहे.






