फोटो सौजन्य -iStock
रक्षाबंधन हा सण प्रत्येक भाऊ – बहिणीसाठी अतिशय खास असतो. सर्वजण मोठ्या उत्साहात रक्षाबंधनाचा सण साजरा करतात. यंदा ऑगस्ट महिन्यात रक्षबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधनाला प्रत्येक भाऊ त्याच्या बहिणीला काही ना काही गिफ्ट देत असतो. तर बहिणीला देखील तिच्या भावासाठी काही खास करण्याची इच्छा असते. पण भावासाठी नक्की करायचं, हा मोठा प्रश्न असतो. या रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या भावासाठी मिल्क केक तयार करू शकता. घरच्या घरी आणि अगदी सोप्या पध्दतीने तुम्ही हा मिल्क केक तयार करू शकता. त्यामुळे तुमच्या रक्षबंधनाचा सण आणखी खास होईल. चला तर मग जाणून घेऊया मिल्क केक तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती.
साहित्य
मिल्क केक रेसिपी
मिल्क केक बनवण्यासाठी तुम्हाला एक जड तळाचा पॅन घ्यावा लागेल. सर्वात आधी या पॅनमध्ये दूध ओतून मध्यम आचेवर उकळून घ्या. चांगली उकळी आल्यावर आच कमी करा आणि दूध सतत फेटत राहा. जेव्हा हे दूध अर्धे कमी होईल तेव्हा पॅनच्या काठावर तयार केलेली मलई बाजूला काढून ठेवा. आता या दुधात थोडा लिंबाचा रस घाला आणि नंतर दही घाला आणि सर्व मिक्स करा. आता हे दूध पुन्हा उकळून घ्या. आता हे दूध एका कपड्याने गाळून घ्या. आता दुधाचा गोळा तयार होईल. हा गोळा एका कपड्याने घट्ट बांधून घ्या आणि जड वस्तूने दाबा.
आता एका पॅनमध्ये तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये दुधाचा गोळा घालून मध्यम आचेवर 10 ते 15 मिनिटे परतून घ्या. आता या मिश्रणामध्ये साखर घालून मिक्स करा. साखर वितळेपर्यंत आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवा. तुम्हाला तुमचा मिल्क केक अधिक रुचकर बनवण्यासाठी त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार त्यात वेलची पावडर, केशर किंवा पिस्ता पावडर टाकू शकता. आता एक ट्रे घ्या, त्यावर थोडं तूप लावा, नंतर हे मिश्रण त्या ट्रेवर ओतून पसरवा. तुम्हाला हव्या त्या आकारात केकचे तुकडे करून हा ट्रे काही काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. अशा प्रकारे तुमचा मिल्क केक तयार होईल.