मलायका अरोरा सुंदर आणि नितळ त्वचेसाठी पिते 'हे' गुणकारी पेय
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या अभिनयामुळे सगळीकडे प्रसिद्ध आहे. तसेच तिच्या त्वचा आणि केसांचे अनेक चाहते आहेत. सगळ्यांचं मलायका अरोराचे केस आणि त्वचा खूप आवडते. मलायका वयाच्या 50 वर्षातसुद्धा तरुण दिसते. तिच्या त्वचेप्रमाणे आपलीही सुंदर आणि चमकदार त्वचा असावी असे सगळ्यांचं वाटते. अनेक महिला सुंदर त्वचा मिळवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. पण हे उपाय करूनसुद्धा अनेकदा काहीच उपयोग होत नाही. अशावेळी तुम्हाआम्हा सगळ्यांना हाच प्रश्न पडतो ना की मलायका अरोराची त्वचा एवढी सुंदर आणि चमकदार कशी? चला तर जाणून घेऊया तिच्या सुंदर त्वचेचं ब्युटी सिक्रेट.
मलायका अरोरा सुंदर त्वचेसाठी खास स्किन केअर रुटीन फॉलो करते. ती अनेकदा तिच्या सोशल मीडियावरून सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी काहींना काही टिप्स शेअर करत असते. या टिप्स तुम्ही सुद्धा फॉलो करू शकता. नुकतंच तिने सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी विटामिन सी युक्त पेयांची माहिती दिली आहे. ती तिच्या दिवसाची सुरुवात विटामिन सी युक्त पेय पिऊन करते. हे पेय बनवण्यासाठी घरातील पदार्थांचा वापर केला जातो. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: निरोगी केसांसाठी नियमित प्या तांब्याच्या भांड्यातले पाणी, केस होतील मऊ
हे देखील वाचा: थायरॉईडने त्रस्त आहात? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन,आरोग्य राहील निरोगी
रोजच्या आहारात विटामिन सी युक्त पेयांचे सेवन केल्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत होते. तसेच त्वचेची गुणवत्ता सुधारून त्वचा मऊ आणि चमकदार दिसते. त्वचेवर आलेल्या बारीक रेषा, सुरकुत्या घालवण्यासाठी नियमित या पेयाचे सेवन करा. व्हिटॅमिन सी त्वचेचा रंग उजळ्वण्यासाठी मदत करते. सूर्याच्या प्रकाशामुळे त्वचेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आहारात विटामिन सी युक्त पेयाचे सेवन करावे.