वयाच्या कोणत्याही वर्षांमध्ये थायरॉईड होण्याची शक्यता असते. पण महिलांमध्ये प्रामुख्याने हा आजार आढळून येतो. थायरॉईड झाल्यानंतर घसा दुखणे, मानेवर अतिरिक्त चरबी वाढणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. जीवनशैलीतील बदलांमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे पौष्टिक आहार, शरीराला आवश्यक झोप, व्यायाम करून निरोगी जीवनशैली जगणे गरजेचे आहे. थायरॉईड झाल्यानंतर खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये पथ्य पाळावे लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला थायरॉईड झाल्यानंतर आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य-istock)
थायरॉईड झाल्यानंतर 'या' पदार्थांचे सेवन करावे
सकाळी उठल्यानंतर नाश्त्यामध्ये नियमित २ किंवा ३ अंड्यांचे सेवन करावे. अंड्यांमध्ये असलेल्या गुणकारी घटकांमुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. अंड्यामध्ये प्रथिने, ओमेगा थ्री फॅटी ॲसिड, सेलेनियम, अँटी-ऑक्सिडंट्स आणि आयोडीन आढळून येते.
भोपळ्याच्या बियांचे नियमित सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. भोपळ्याच्या बिया अनेक आजारांवर औषधी आहेत. थायरॉईड किंवा इतर कोणत्याही समस्या जाणवू लागल्यास भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे.
सफरचंदामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. अनेकदा डॉक्टरसुद्धा नियमित एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. शरीरातील डिटॉक्सिफिकेशनसाठी सफरचंद मदत करते.
भारतीय गूसबेरीचे सेवन केल्यामुळे थायरॉईड कमी होण्यास मदत होते. तसेच तुम्ही आवळ्याचे सुद्धा सेवन करू शकता. यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा आवळा पावडर मिक्स करून प्यायल्यास थायरॉईड कमी होईल.
थायरॉईड झाल्यानंतर कच्च्या नारळाचे सेवन करावे. यामुळे थायरॉइडची पातळी कमी होण्यास मदत होते. नारळाचे पाणी किंवा नारळाचे खोबरे तुम्ही जेवणात किंवा कच्चे सुद्धा खाऊ शकता.