काळे डाग घालवण्यासाठी नारळाच्या तेलातर मिक्स करा 'हे' पदार्थ,
महिला आणि पुरुषांसह सगळ्यांचं नेहमी सुंदर दिसायचं असत. सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्वचेवर पिंपल्स आल्यानंतर ते घालवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले क्रीम्स लावले जातात. याशिवाय महिला पिंपल्स आल्यानंतर क्लीनअप करून घेतात. मात्र यामुळे त्वचेमध्ये फारसा बदल दिसून येत नाही. दैनंदिन आहारात झालेल्या बदलांचा परिमाण त्वचेवर लगेच दिसून येतो. पिंपल्स, मुरूम किंवा ऍक्ने आल्यानंतर त्वचेवर काळे डाग तसेच राहतात. त्यामुळे त्वचेवरील टॅनिंग आणि डार्क स्पॉट घालवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात कोणते पदार्थ मिक्स करून लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे त्वचा अतिशय सुंदर आणि देखणी होईल.(फोटो सौजन्य – iStock)
सुंदर आणि हेल्दी स्किन हवी आहे? मग फॉलो करा ‘हे’ Skin Care रुटीन, त्वचा होईल चमकदार
खोबऱ्याचे तेल त्वचेसाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. या तेलात असलेले गुणधर्म त्वचेसंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करतात. त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर करू शकता. याशिवाय नारळाच्या तेलात फॅटी ॲसिड आणि विटामिन ई इत्यादी घटक आढळून येतात. त्वचेवरील इन्फेक्शनपासून सूक्त मिळवण्यासाठी आणि बॅक्टेरियापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर तुम्ही करू शकता. नैसर्गिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या नारळाच्या तेलात अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात.
त्वचेवरील टॅनिंग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही खोबऱ्याच्या तेलात कोरफडचा गर मिक्स करू शकता. यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये खोबऱ्याचं तेल घेऊन त्यात कोरफड जेल टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होईल आणि त्वचा उजळदार, सुंदर दिसते. कोरफड जेल त्वचेला लावल्यामुळे त्वचा अधिक हायड्रेट आणि स्वच्छ राहते.
लिंबाच्या रसात आढळून येणारे घटक त्वचेच्या आरोग्यासाठी प्रभावी ठरतात. यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग कमी होऊन त्वचा अधिक सुंदर आणि उजळदार दिसते. त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यसाठी नारळाच्या तेलाचा वापर करावा. वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात खोबरेल तेल टाकून मिक्स करा. त्यानंतर तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून १० मिनिटं तसेच ठेवा. नंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय नियमित केल्यास त्वचेवरील टॅनिंग आणि काळे डाग कमी होण्यास मदत होईल.