मूल सतत प्रायव्हेट पार्टला हात लावत असेल तर काय करावे (फोटो सौजन्य - iStock)
त्यामागील मुलांची मानसिकता आणि नक्की काय परिस्थिती आहे हे पालकांनी जाणून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. निमिषा अरोरा यांनी या स्थितीबद्दल मौल्यवान सल्ला दिला आहे. पालकांनी ही परिस्थिती कशी हाताळावी आणि अशावेळी पालकांनी कशा पद्धतीने वागले पाहिजे याबाबत त्यांनी तपशीलवार सांगितले आहे.
मूल वारंवार गुप्तांगांना स्पर्श करते
इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये, बालरोगतज्ज्ञ डॉ. निमिषा अरोरा स्पष्ट करतात की अलीकडेच, एका वर्षाच्या मुलाची आई ओपीडीमध्ये आली होती. आईने सांगितले की तिच्या मुलाने वारंवार त्याच्या गुप्तांगांना स्पर्श केला. या सवयीमुळे आई खूप काळजीत होती आणि तिचा मुलगा असे वागत आहो याची तिला अत्यंत लाज वाटत होती. पण यामध्ये लाजण्यासारखे काहीही नाही
Parenting Tips: नाताळच्या सुट्टीत मुलांना लावा निरोगी आहाराच्या सवयी, पडणार नाही आजारी
हे सामान्य वर्तन आहे
डॉक्टरांनी व्हिडिओमध्ये पुढे स्पष्ट केले आहे की, अशा प्रकरणांमध्ये, पालकांनी हे समजून घेतले पाहिजे की मुलांमध्ये गुप्तांग ओढणे किंवा वारंवार स्पर्श करणे ही एक सामान्य वागणूक आहे. हे वर्तन लहान मुलापासून ते प्रीस्कूल वयापर्यंत दिसून येते. यामध्ये कोणतीही चूक नाही. त्याची कारणं काय आहेत हे मात्र पालकांनी लाजण्यापेक्षा अधिक समजून घेण्याची गरज आहे. तुम्ही मुलांना ओरडून काहीही होणार नाही. यामुळे मूल अधिक घाबरेल. त्यापेक्षा यामागील कारणं समजून घेऊन त्यावर योग्य पद्धतीने वागण्याची गरज आहे.
शरीर नक्की कसे आहे जाणून घेणे
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मुले चार ते सहा महिन्यांच्या वयात त्यांचे शरीर नक्की कसे आहे याचा शोध घेण्यास सुरुवात करतात. ज्याप्रमाणे मुलं वारंवार डोळे, कान किंवा नाकाला स्पर्श करतात, त्याचप्रमाणे ते त्यांच्या गुप्तांगांनाही स्पर्श करतात. यामध्ये कोणतेही चुकीचे वर्तन नाही. त्यांना आपलं शरीर कसं आहे आणि शरीराचे भाग कसे आहेत हे फक्त तपासून पहायचे असते आणि त्यामुळेच ते Private Part ला देखील स्पर्श करतात.
यामुळे अपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते
बालरोगतज्ज्ञ म्हणतात की मुलांसाठी हे पूर्णपणे सामान्य वर्तन आहे, परंतु पालकांना अशा परिस्थितीत अनेकदा लाज वाटते. ते अनेकदा मुलाला ओरडतात किंवा फटकारतात. ही एक अतिरेकी प्रतिक्रिया आहे, ज्यामुळे मुलामध्ये लैंगिकतेबद्दल अपराधीपणाची भावना आणखी निर्माण होऊ शकते आणि मूल यामुळे अधिकाधिक वेगळ्या मार्गावर जाऊ शकते. त्यामुळे पालकांनी याची खात्री करून घ्यावी की, आपल्या मुलाच्या अशा वर्तनाकडे एक सजग पालक म्हणून पहावे.
Parenting Tips: 3 गोष्टीसाठी मुलांना कधीच ओरडू नये, लर्निंग स्किलवर होतो परिणाम; पालकांनी व्हा सावध
२ किंवा अडीच वर्षाचे मूल
डॉ. अरोरा म्हणतात की पालकांनी त्यांच्या मुलाच्या कुतूहलाचा वापर संधी म्हणून करावा. नंतर, जेव्हा मूल त्यांच्या शरीराचे अवयव समजून घेण्याइतके मोठे होते, तेव्हा त्यांना आंघोळीच्या वेळी शारीरिकदृष्ट्या योग्य नावे शिकवा. उदाहरणार्थ, “बाळा, शरीराच्या या भागाला Penis म्हणतात” किंवा मुलींना सांगावे की, “ही तुमची योनी आहे.” जेव्हा मूल दोन किंवा अडीच वर्षांचे असते आणि त्यांना थोडीशी समज असते, तेव्हा हळूहळू त्यांना या गोष्टींबद्दल योग्य माहिती देणे सुरू करा, जेणेकरून त्यांचे असणारे कुतूहल योग्य पद्धतीने शमवले जाईल आणि सतत आपल्या प्रायव्हेट पार्टला हात मूल लावणार नाही.
मुलाचे लक्ष विचलित करा
बालरोगतज्ज्ञ म्हणतात की मुलांनी त्यांच्या शरीराचा शोध घेणे ठीक आहे, परंतु सार्वजनिक ठिकाणी असं करण्याची परवानगी देऊ नये. जर मूल सार्वजनिक ठिकाणी असे करत असेल आणि आजूबाजूच्या लोकांना अस्वस्थ वाटत असेल, तर पालकांनी शांतपणे पँट किंवा डायपर घालावे आणि त्यांचे लक्ष दुसऱ्या गोष्टीकडे वळविण्याचा प्रयत्न करावा.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा
डॉक्टरांचा असा निष्कर्ष आहे की एकदा मूल शाळेत गेले आणि इतर मुले असे वागत नसल्याचे पाहिले की, ही सवय हळूहळू स्वतःहून नाहीशी होते. तथापि, जर मुलाला त्यांच्या खाजगी भागात खाज सुटणे, लालसरपणा किंवा संसर्ग होत असेल किंवा कालांतराने ही सवय वाढत राहिली तर विलंब न करता बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
पहा व्हिडिओ






