पालकांनी आपल्या मुलांना कशा हेल्दी सवयी लावाव्यात (फोटो सौजन्य - iStock/Google Gemini AI)
ख्रिसमस हा मुलांसाठी एक उत्साहाचा काळ आहे. चॉकलेट, कुकीज पासून ते केक, गोडधोड स्नॅक्स आणि नाताळच्या पार्टीमुळे मुलांमधील उत्साह काही वेगळाच असतो आणि अशावेळा मुलं नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात साखरेचे सेवन करतात. सणासुदीच्या काळात विविध पदार्थांचा आनंद घेणे हा उत्सवाचा एक भाग असला तरी, जास्त प्रमाणात अशा पदार्थांचे सेवन केल्याने पोटदुखी, अपचन, भूक न लागणे, चिडचिड होणे, वजन वाढणे आणि झोपेत व्यत्यय येणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. डॉ. अनुषा राव, नवजात शिशु आणि बालरोग तज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल फॅार वुमन अँड चिल्ड्रन, पुणे यांनी अधिक माहिती दिली आहे.
खाण्याच्या चांगल्या सवयी असूनही तुम्ही सारखे आजारी पडता का? असू शकते ग्रह दोषाचे कारण
सवयी कशा लावाल?
हिवाळ्यात पचनक्रिया मंदावते आणि अशावेळी जेव्हा मुलं खूप गोड पदार्थ, तळलेले पदार्थ आणि चरबीयुत्त पदार्थांचे सेवन करतात तेव्हा त्यांना थकवा आणि अस्वस्थता जाणवू शकते. म्हणूनच पालकांनी मुलांना निरोगी सवयींमध्ये संतुलन राखण्यास मदत केली पाहिजे.
कोणत्या सवयी महत्त्वाच्या






