लवकरच नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. सं म्हंटल की, महिलांचा शृंगार आलाच. या काळात महिलांना नटायला फार आवडते. मात्र सणांच्या दिवसांत आपली फार लगबग होत असते ज्यामुळे याकाळात चेहऱ्याची काळजी घेणे फार गरजेचे असते. नवरात्रात अनेकजण उपवास करतात, यामुळे शरीराला पोषण द्रव्य मिळत नाही. अशा परिस्थितीत नवरात्रीच्या 9 दिवस चेहऱ्याची चमक कायम ठेवण्यासाठी त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे.
आता आपला चेहरा सुंदर आणि फ्रेश ठेवण्यासाठी तुम्हाला बाजारातील महागडे प्रोडक्टस खरेदी करण्याची आवश्यकता नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, यासाठी तुम्ही घरच्या घरी काही सोप्या टिप्सचा वापर करू शकता. या टिप्सच्या मदतीने कामाच्या गडबडीतही तुमचा चेहरा टवटवीत आणि सुंदर दिसेल. हे घरगुती उपाय फार सोपे आणि साईचे आहेत.
हेदेखील वाचा – चेहरा आणि नाकावरील ब्लॅकहेड्स काढून छिद्र मोकळी करण्यासाठी लिंबू करेल तुमची मदत, अशाप्रकारे करा वापर
त्वचा हायड्रेट करण्यासाठी अनेकदा कोरफडीचा वापर केला जातो. तुम्ही यापासून टोनर तयार करून आपल्या चेहऱ्यावर लावू शकता. घरात कोरफडीचा टोनर तयार करणे फार सोपे आहे. यासाठी प्रथम अर्धा कप गुलाब जल घ्या. नंतर त्यात एक कप ताजा कोरफडीचा गर मिळवा. आता हा तयार टोनर एका बाटलीत साठवा आणि हवा तेव्हा चेहऱ्याला लावा. तुम्ही तुमच्या सोईनुसार कधीही याचा वापर करू शकता. याच्या नियमित वापराने चेहऱ्यावर नॅचरल ग्लो दिसू लागतो.
तुळशीमध्ये अनेक नैसर्गिक गुणधर्म असतात जे त्वचेवरील बॅक्टेरिया आणि जंतू दूर करण्यास मदत करतात. तुम्ही घरीच तुळशीचा टोनर तयार करू शकता. यासाठी 7-9 तुळशीची पाने एका टोपात टाक. नंतर त्यात एक कप पाणी घालून मध्यम आचेवर उकळू द्या. 18-20 मिनिटे याला उकळवून घ्या आणि मग गॅस बंद करा. थंड झाल्यावर हे पाणी एका बाटलीत काढा आणि मग त्वचेवर याचा स्प्रे करा.
हेदेखील वाचा – केस खूप पातळ झालेत? मग बाजारातील केमिकल प्रोडक्टसचा वापर थांबवा आणि हे हर्बल उपाय करून पहा
तांदळाचे पाणी चेहऱ्यावर चमक आणण्यास आणि चेहऱ्याला गोरे बनवण्यास मदत करते. यात जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. हे टोनर घरच्या घरी बनवण्यासाठी प्रथम एक चमचा तांदूळ एका भांड्यात टाका. मग यात पाणी टाका आणि ढगाळ होईपर्यंत ढवळत राहा.यानंतर हे पाणी एका बाटलीत काढा. त्यात कापसाचे पॅड भिजवा आणि नंतर वापरा. याचा नियमित वापर चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यास मदत करेल.
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.