नवजात बाळाची करण्यात येणारी हील प्रीक टेस्ट काय असते
बाळ जन्माला आल्याबरोबर सर्वप्रथम प्रत्येक डॉक्टर, हील प्रीक टेस्ट ज्याला न्यूबॉर्न स्क्रिनिंगदेखील म्हणतात, ती करतात. या साध्या रक्त चाचणीमुळे विविध गंभीर परंतु उपचार करण्यायोग्य आणि सहज लक्षात न येणाऱ्या विकारांविषयी समजते. रक्तचाचणी मुळे लवकर निदान होऊन डॉक्टरांना त्वरीत उपचार चालू करणे शक्य होते जेणेकरून बाळाचे आरोग्य आणि जीवनमान सुधारते.
बाळाचा जन्म झाल्यानंतर या नवजात बाळाची स्क्रिनिंग करणे किंवा हील प्रीक टेस्ट करणे खरंच गरजेचे आहे का? नवख्या आई-बाबांना याबाबत काहीच माहीत नसतं अथवा जे लवकरच आई-बाबा होऊ घातले आहेत त्यांनी ही माहिती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. डॉ. आकाश शाह, सल्लागार पॅथॉलॉजी, न्यूबर्ग डायग्नॉस्टिक्स यांनी ही माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
हील प्रीक टेस्ट म्हणजे काय?
हील प्रीक टेस्टमुळे काय होतं
हील प्रीक टेस्ट मध्ये बाळाच्या टाचेतून रक्ताचा नमूना घेणे. हा रक्ताचा घेतलेला नमूना प्रयोग शाळेत पाठवला जातो जिथे वेगवेगळ्या रोगांसाठी त्याची चाचणी घेतली जाते. बहुतेक देशांत ही चाचणी बाळ जन्माला आल्यानंतर 24 ते 48 तासात केली जाते. ही प्रक्रिया थोडी त्रासदायक वाटत असली तरी याचा बाळाला थोडासा त्रास होतो आणि पटकन होणारी आहे.
हेदेखील वाचा – स्तनपानामुळे होतो स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी, तज्ज्ञांचा खुलासा
हील प्रीक टेस्ट महत्वाची का आहे?
ही टेस्ट, बाळाच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या विविध गंभीर आजारांची माहिती देत असल्याने, फार महत्वाची आहे. या आजारांमध्ये चयापचय विकार, हार्मोन इम्बॅलन्स, अनुवंशिक विकार यासारख्या जन्माच्या वेळी असणाऱ्या पण सहज लक्षात न येणाऱ्या विकारांविषयी माहिती मिळते. यावर उपचार न झाल्यास यामुळे गंभीर आजार होऊ शकतात किंवा विकासास विलंब होऊ शकतो. आनंदाची बाब म्हणजे लवकर लक्षात आल्याने या विकारांवर औषधाने, विशिष्ट आहाराने किंवा इतर उपचारांनी इलाज करणे शक्य होते.
न्युबॉर्न स्क्रीनिंगमध्ये तपासले जाणारे विकार
कोणते आजार तपासले जातात
न्युबॉर्न स्क्रीनिंगमुळे खूप वेगवेगळ्या आजारांविषयी माहिती मिळू शकते, नेमक्या चाचण्या प्रत्येक देश भागानुसार बदलू शकतात. यामध्ये सामान्यतः पुढील विकारांसाठी चाचण्या केल्या जातात:
हेदेखील वाचा – बाळाला मालिश करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या
टेस्टमुळे होणारे फायदे
या तपासणीमुळे कोणते फायदे मिळतात
हील प्रीक टेस्ट मुळे डॉक्टरांना आजार लवकर, बऱ्याचदा लक्षणे दिसण्यापूर्वी, लक्षात येतात. लवकर उपचार करणे शक्य झाल्याने विकासाला विलंब, अवयवाला इजा किंवा अगदी मृत्यू यासारख्या गंभीर समस्या टाळता येतात. उदाहरणार्थ, जर बाळाला पीकेयु झाल्याचे लक्षात आल्यास, डॉक्टर मेंदूला इजा पोहोचू नये म्हणून डॉक्टर तातडीने आहारात बदल करू शकतात. त्याच प्रमाणे जर हायपोथायरॉडीझम असल्याचे लवकर लक्षात आल्यास हार्मोन रीप्लेसमेन्ट थेरपी,बाळाची योग्य वाढ आणि विकास होण्यासाठी, फायदेशीर ठरते.
हील प्रीक टेस्टम्हणजे बाळाच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात फरक पाडणारी एक अतिशय सोपी आणि पटकन होणारी प्रक्रिया आहे. बाळाच्या जन्माच्या वेळीच विविध प्रकारच्या गंभीर विकारांविषयी माहिती मिळाल्याने डॉक्टर बाळावर शक्य तितक्या लवकरयोग्य ते उपचार होतील याची काळजी घेऊ शकतात, जेणेकरून दीर्घकालीन गंभीर विकार टाळणे शक्य होते. लवकर होणारी ही चाचणी म्हणजे बाळाच्या जीवनाची उत्तम सुरूवात होण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले महत्वपूर्ण पाऊल आहे.