मेथीच्या पाण्यात चिया सीड्स मिक्स करून पिण्याचा आरोग्यदायी फायदा
निरोगी राहण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात. काहीजण आपल्या आहारात फळांचा समावेश करतात, तर काहींनी भाज्यांना आपल्या दिनक्रमाचा भाग बनवले आहे. या सर्वांशिवाय बरेच लोक त्यांच्या आहारात काही पौष्टिक पेयांचादेखील समावेश करतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याला खूप फायदा होतो. मेथीचे पाणी यापैकी एक आहे, जे पिण्याने अनेक समस्या दूर होतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि निरोगी आतडे आरोग्यास प्रोत्साहन देते.
इतकेच नाही तर मेथीचे पाणी चयापचय वाढवण्यास आणि वजन कमी करण्यासही मदत करते. याशिवाय, यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत, ज्यामुळे सांधेदुखी कमी होते आणि प्रतिकारशक्ती वाढते. पण तुम्हाला माहित आहे का की मेथीच्या पाण्यात चिया बिया घातल्यास त्याचे फायदे दुप्पट होतात. चला जाणून घेऊया मेथीच्या पाण्याचे फायदे, आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock)
उत्तम पचनक्रियेसाठी
पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी करून घ्या वापर
मेथीमध्ये असलेले पाण्यात विरघळणारे फायबर पचनतंत्र सुधारते, ज्यामुळे बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते. दुसरीकडे, चिया सीड्समध्ये जास्त प्रमाणात अघुलनशील फायबर असते, जे आतड्यांचे आरोग्य अर्थात गट हेल्थ सुधारते. अशाप्रकारे, ते दोन्ही मिळून फायबरचे संतुलन तयार करतात, ज्यामुळे एकूण पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात
रोज सकाळी उपाशी पोटी प्या मेथीचे पाणी, होतील ‘हे’ जबदस्त फायदे
वजन कमी करण्यास उत्तम
वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय
मेथीचे दाणे पोट दीर्घकाळ भरलेले ठेवतात आणि रक्तातील साखर नियंत्रित करून भूक कमी करण्यास मदत करतात. त्याच वेळी, चिया सीड्स पाणी शोषून घेतात आणि पोटात दब्ब बसतात, ज्यामुळे भूक कमी होते आणि आपण बराच वेळ काहीही न खाता राहू शकतो. अशा प्रकारे मेथी आणि चिया सीड्सचे पाणी वजन कमी करण्यास मदत करते
ब्लड शुगर नियंत्रणासाठी
रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी
मेथीच्या बियांमध्ये संयुगे असतात जे इंसुलिन संवेदनशीलता सुधारतात आणि खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची वाढ कमी करतात. त्याच वेळी, चिया सीड्स त्यांच्या जेल-फॉर्मिंग फायबरमुळे साखरेचे शोषण कमी करतात. अशाप्रकारे, चिया सीड्स आणि मेथीचे पाणी रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे, त्यामुळे रोज सकाळी याचे तुम्ही उपाशीपोटी सेवन करू शकता
उत्तम डिटॉक्सिफिकेशन
शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकून डिटॉक्स करण्यासाठी
मेथीचे पाणी नैसर्गिक डिटॉक्स म्हणून काम करते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि हायड्रेशन सुधारते. अशा वेळी त्यात चिया सीड्स टाकल्यास शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते. हायड्रेशन आणि उत्तम ऊर्जा राखण्यासाठी हे मिश्रण चांगले ठरते, विशेषत: व्यायाम केल्यानंतर तुम्ही याचे सेवन करावे
Weight Loss साठी मेथीचं पाणी पिताय का? व्हा सावध नाहीतर होतील गंभीर परिणाम
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
केसांसाठी आणि त्वचेसाठीही अत्यंत उपयुक्त
मेथीच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि केसांची चांगली वाढ होऊ शकते. त्याच वेळी, चिया सीड्समध्ये आवश्यक फॅटी अॅसिड आणि जिंक असतात, जे जळजळ कमी करतात आणि केस आणि त्वचा निरोगी बनवतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.