पेरूचे सेवन करणे आरोग्याला फायदेशीर (फोटो- istockphoto)
थंडीच्या दिवसांमध्ये फळांचे सेवन करणे ठरते फायदेशीर
पेरूच्या सेवनाने शरीराला होतात अनेक फायदे
आयुर्वेदमध्ये पेरूला समजले जाते अमृतफळ
सध्या देशभरात थंडीचा कडाका वाढला आहे. अनेक राज्यांमध्ये तापमानात घट झाली आहे. दरम्यान हिवाळ्याच्या काळामध्ये आपल्या शरीराची काळजी (Lifestyle) घेणे आवश्यक असते. सकस आहार, नियमित व्यायाम करून शरीर तंदुरुस्त ठेवता येते. थंडीच्या काळात फळांचे सेवन करणे आरोग्याला फायदेशीर ठरते. यामध्ये पेरू (Fruits) फळाचे सेवन केल्यास शरीराला आधीम फायदेशीर ठरू शकते.
पेरू केवळ नुसते फळ नसून आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असे खाद्य आहे. हिवाळ्याच्या काळात पेरूचे सेवन करणे अत्यंत लाभदायक समजले जाते. केवळ चवीसाठी नव्हे तर आरोग्यासाठी पेरू हे अत्यंत चांगले समजले जाते. पेरूचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होते. पेरूचे सेवन केलयेण कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेऊयात.
पेरूमध्ये आहेत अनेक पोषक तत्वे
पेरू फळामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकरक शक्ती वाढण्यास मदत होते. त्वचा उजळते. यात फायबर, पोटेशियम असल्याने पेरूला सुपरफ्रूट असे म्हटले जाते.
पेरूचे सेवन केल्याने शरीराला अनेक लाभ होतात. पेरूमध्ये असणारे पोशाक तत्वे पेशींपासून होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतात. जळजळ होणे यापासून देखील बचाव होतो. ज्या लोकांना पोटाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी पेरूचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
पेरूमध्ये असणारे फायबर आपल्या शरीराचे पाचन सुधारण्यास मदत होते. यामुळे पोट हलके राहते. शरीरातील अग्नि संतुलित करणारे फळ म्हणून पेरूला आयुर्वेदमध्ये महत्व आहे. याकहा अर्थ पेरू खाल्ल्यस पचनसंस्था मजबूत होते. तसेच शरीरात ऊर्जेचे योग्य संतुलन राहण्यास मदत होते.
‘या’ आजारांवर






