प्रियांका चोप्राला नेमका आजार काय?
बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या अभिनयामुळे प्रसिद्ध आहे. मात्र तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या आजाराबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यामध्ये तिने नाकाच्या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे तिला दमा आणि नैराश्याची समस्या उद्भवू लागली आहे. याशिवाय प्रियांका म्हणाली, कोरोनानंतर दम्याच्या आजाराची खूप जास्त भीती वाटतं होती. तसेच नाकाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. प्रियांकाच्या मते, आयुष्य खूप कठीण होते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ लागला. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दम्याचा त्रास वाढू लागतो. तापमान जास्त उष्ण असल्यामुळे श्वास घेताना दम्याची लक्षणे दिसून येतात. उष्णता वाढल्यामुळे श्वास घेणे सुद्धा कठीण झाले आहे.(फोटो सौजन्य – iStock)
प्रियांका चोप्राने तिला झालेल्या आजाराबद्दल सांगताना ती म्हणाली, कोरोनानंतर तिला दम्याची खूप जास्त भीती वाटतं होती. त्यानंतर तिच्या नाकाची शस्त्रक्रिया झाली. मात्र चुकीच्या शस्त्रक्रियेचा परिणाम आरोग्यावर झाला. नाकाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला होता. दमा झाल्यानंतर श्वास घेण्याची समस्या उद्भवू लागते.
दमा हा एक जुनाट आजार आहे, ज्यामुळे वायुमार्गाची जळजळ, श्वास घेण्यास त्रास, छातीमध्ये दुखणे, खोकला इत्यादी समस्या उद्भवतात. थंडीच्या दिवसांमध्ये दम्याचा त्रास जास्त उद्भवतो. दम्याचा त्रास लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचं जाणवतो. मात्र अनेक लोक दम्याची लक्षणे दिसू लागल्यानंतर दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष केल्यामुळे परिस्थिती आणखीन गंभीर होते. त्यामुळे दमा झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी.
अंतराळातून परत आल्यानंतर Astronauts ला ‘या’ गंभीर आजारांशी द्यावे लागते झुंज, काय आहेत लक्षणे?