ममेरू सोहळ्यासाठी राधिका मर्चंटचा लुक (फोटो सौजन्य - मनिष मल्होत्रा इन्स्टाग्राम)
अंबानी कुटुंबाची धाकटी सून राधिका मर्चंट ही खरी फॅशनिस्टा आहे आणि ती प्रत्येक वेळी फॅशन गोल्स सेट करताना दिसते. कॉकटेल नाईट असो, पारंपारिक पूजा लुक असो किंवा सुंदर ग्लॅमरस लुक असो, राधिकाला प्रत्येक स्टाइल स्टेटमेंट कसं कॅरी करायचं हे चांगलं माहीत आहे.
राधिका आणि अनंत अंबानीच्या लग्नाचा सोहळा ‘ममेरू सोहळ्या’ने सुरू झाला आहे आणि यावेळी तिचा लुक मनिष मल्होत्राने डिझाईन केला आहे. मनिषने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याची माहिती दिली आहे. पाहा राधिकाचा हा एलिगंट लुक (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
राधिकाचा पारंपरिक घागरा
राधिकाचा घागरा चोली
राधिकाने ममेरू सोहळ्यासाठी प्रसिद्ध फॅशन डिझाईनर मनिष मल्होत्राच्या कलेक्शनमधील बांधणी लेहंगा निवडला होता. गुलाबी आणि केशरी अशा दुहेरी रंगामध्ये हा लेहंगा बनविण्यात आला असून यावर गुजराती प्रिंट होते जे बनारसी ब्रोकेडने तयार करण्यात आले आहेत. तसंच यावर कढई वर्क करण्यात आले असून यावर दुर्गा देवीचा श्लोक कढई वर्कसह कोरण्यात आला आहे. त्यामुळे याची शोभा अधिक वाढली आहे.
विंटेज ब्लाऊज
क्लासी आणि एलिगंट ब्लाऊज स्टाईल
लेहंग्याला शोभेल असाच क्लासी आणि विंटेज केशरी ब्लाऊज देण्यात आला आहे. राधिका या लेहंग्यात अत्यंत सुंदर आणि एखाद्या बाहुलीप्रमाणे दिसतेय. ब्लाऊजवर संपूर्णतः गोल्डन कढई वर्क करण्यात आले असून खूपच क्लासी आणि हेव्ही असा ब्लाऊज यावर शिवण्यात आला आहे. राधिकाने अत्यंत एलिगंटली हा लुक कॅरी केलाय.
आई शैलाचे दागिने
पारंपरिक रॉयल गोल्डन दागिने
या सुंदर आऊटफिटसह राधिका मर्चंटने गोल्डन रिगल पीस दागिने परिधान केलेले दिसून येत आहे. गोल्डन चोकर, मॅचिंग कानातले, मांगटिका, बांगड्या घालून तिने हा लुक पूर्ण केलाय. आपली आई शैलाचे दागिने घालणं तिने यावेळी पसंत केलं. तर राधिकाचा हा संपूर्ण लुक रिया कपूरने स्टाईल केला आहे.
स्टायलिश हेअर अॅक्सेसरीज
युनिक हेअरस्टाईल
राधिकाने यावेळी आपल्या केसांवरही पूर्ण अॅक्सेसरीज घातल्या होत्या. वेगळीच हेअरस्टाईल यावेळी पाहायला मिळाली. अत्यंत हेव्ही लेहंग्याला मॅच होतील अशा अॅक्सेसरीज तिने हेअरस्टाईलसाठी वापरल्या होत्या. तिचा हा लुक एखाद्या लग्नसमारंभासाठीही तुम्ही कॅरी करू शकता.
मॅट मेकअप
राधिकाचा क्लासी मेकअप
राधिकाने या हेव्ही लेहंग्यासह मेकअपदेखील हेव्ही केला आहे. तिचा हा मॅट मेकअप कमालीचा आकर्षक आणि सुंदर दिसतोय. डार्क काजळ, डार्क भुवया, आयलायनर, आयलॅशेस, ब्राऊन शेड आयशॅडो, हायलायटर आणि लेहंग्याला शोभणारी अशी डार्क राणी लिपस्टिक लावत तिने हा लुक पूर्ण केलाय.