चांगल्या झोपेसाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
१४ मार्चला संपूर्ण जगभरात जागतिक झोप दिवस साजरा केला जातो. धावपळीची जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत मोबाईल किंवा टीव्ही पाहत जागरण केल्यामुळे झोपही गुणवत्ता बिघडण्याची शक्यता असते. अपुऱ्या झोपेमुळे पचनक्रिया बिघडते आणि संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळॆ निरोगी आरोग्यासाठी नियमित ७ किंवा ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. झोपेमुळे शरीराला अनेक फायदे होतात.(फोटो सौजन्य-istock)
त्वचा, आरोग्य आणि केसांच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळतो.याशिवाय सकाळी उशिरापर्यंत जाग येणे, रात्री तासनतास फोन वापरणे आणि सतत जगाच्या चिंतेत राहणे इत्यादी अनेक गोष्टींचा नकारात्मक परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे झोप खराब होऊन आरोग्य बिघडते. त्यामुळे चांगले झोपेसाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चांगल्या झोपेसाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉली केल्यास तुमची खराब झालेली झोपेची गुणवत्ता सुधारेल.
सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं लगेच मोबाईल किंवा टीव्ही बघण्याची सवय असते. मात्र असे केल्यामुळे शरीरातील तणाव कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागतो. शरीराचा वाढलेला ताण कमी करण्यासाठी आणि झोप सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी सूर्यप्रकाशात जावे. सकाळच्या सूर्यप्रकाशामुळे मानसिक स्पष्टता येते, मनःस्थिती सुधारते आणि चांगले वाटणाऱ्या न्यूरोट्रांसमीटर सेरोटोनिनची पातळी वाढण्यास मदत होते.
चहा किंवा कॉफीचे सेवन संध्याकाळच्या वेळी करावे. कारण चहा कॉफीमध्ये असलेले कॅफिन शरीरामध्ये ६ तासांपर्यंत तसेच टिकून राहते. ज्यामुळे लवकर झोप येत नाही. शरीरात कॅफिन तसेच टिकून राहिल्यामुळे रात्रीच्या वेळी लवकर झोप लागत नाही. त्यामुळे रात्री झोपण्याच्या ५ किंवा ६ तास आधी कॅफिन युक्त पदार्थांचे सेवन करू नये. या पदार्थांचे कमीत कमी सेवन केल्यास झोप आणि आरोग्य दोन्ही सुधारेल.
शरीरात वाढलेला मानसिक तणाव अनेक समस्यांचे कारण आहे. शरीरात वाढलेल्या तणावामुळे रात्रीच्या वेळी लवकर झोप लागत नाही. आधिकाल झोप न लागल्यामुळे झोपेची गुणवत्ता खराब होऊन जाते आणि शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात तणाव वाढल्यानंतर शरीराच्या निरोगी पेशींवर देखील तणाव वाढतो, ज्याचा परिणाम झोपेच्या गुणवत्तेवर होण्याची शक्यता असते. त्यामुळे तणावपूर्ण जीवन न जगता आनंदी जीवन जगणे आवश्यक आहे. झोपेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी या गोष्टी फॉलो केल्यास शरीराला आणि मनाला अनेक फायदे होतील.