लसूण तर सर्वांनाच माहिती आहे. स्वयंपाक करताना भाजी किंवा डाळीला तडका देण्यासाठी गृहिणी लसणाचा वापर करतात. लसणाची चटणीसुद्धा बनवली जाते. लसूण खाण्याने हृदय मजबूत होते. याशिवाय त्याच्यामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे आरोग्य चांगले राहू शकते. अनेक आजारांवर गुणकारी असलेला लसूण पुरूषांसाठी तर खुपच लाभदायक आहे. लसूण खाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.






