तिरंग्याचा सन्मान, संविधानाचा अभिमान...! प्रजासत्ताक दिनानिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा
भारतात दरवर्षी २६ जानेवारी मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाला देशाच्या इतिहासात खूप जास्त महत्व आहे. १९५० साली याच दिवशी भारताची राज्यघटना लागू झाली आणि भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक बनला आहे. यादिवशी शाळा, महाविद्यालयांमध्ये अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तंत्र्य, समता आणि बंधुता हे केवळ शब्द नसून आपली जीवनपद्धती आहे. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी त्याग, संघर्ष आणि बलिदानातून हा भारत देश घडला आहे. त्यामुळे २६ जानेवारी निमित्त नातेवाईक आणि आपल्या नातेवाईकांना तुम्ही मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता. या शुभेच्छा वाचून तुमच्या मनात सुद्धा देशभक्तीपर प्रेम जागरूक होईल. प्रजासत्ताक दिन हा केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस नसून संविधानाच्या मूल्यांची आठवण करून देणारे महत्वपूर्ण शब्द आहेत.(फोटो सौजन्य – istock)
Republic Day 2026: ७७ वा की ७८ वा? २०२६ च्या प्रजासत्ताक …
“पृथ्वीवर अशी जागा आहे जिथे माणसाच्या अस्तित्वाचे स्वप्न सुरु झाले. तेव्हापासून जिवंत मनुष्यांच्या सर्व स्वप्नांना घर सापडले आहे, ते घर म्हणजे भारत आहे. ” – रोमेन रोलँड
“बऱ्याच वर्षांपूर्वी आम्ही प्रयत्न केले आणि आता आपल्या तारणाची पूर्तता करण्याची वेळ आली आहे. मध्यरात्रीच्या वेळी जेव्हा जग झोपी जाईल, तेव्हा भारत जीवन आणि स्वातंत्र्यासाठी जागृत होईल. ” – जवाहरलाल नेहरू
“नव्या देशाची नवीन ओळख निर्माण होऊ द्या, प्रत्येक शेतकऱ्याचे घर वाढू द्या, शेतात पीक उगवू द्या आणि प्रत्येक वर्गाच्या लोकांना सम्मान मिळू द्या” – स्वामी विवेकानंद
“नेहमी विचार आणि शब्द आणि कृतीत संपूर्ण सुसंवाद साधण्याचे लक्ष्य ठेवा. आपले विचार शुद्ध करण्याचे आमचे ध्येय आहे आणि सर्व काही ठीक होईल. ” – महात्मा गांधी
तिरंग्याचा सन्मान, संविधानाचा अभिमान
देशासाठी बलिदान देणाऱ्यांना सलाम!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या देशाची ओळख म्हणजे विविधतेत एकता
संविधानाच्या मार्गावर चालत
आपण भारताला अधिक बलवान बनवूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधानाने
दिलेल्या हक्कांसोबत कर्तव्यांचीही आठवण ठेवूया
एक जबाबदार नागरिक होण्याचा संकल्प करूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी भारतदेश घडविला…!
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!
स्वातंत्र्यासाठी फडकतो ध्वज
सूर्य तळपतो प्रगतीचा
भारतभूच्या पराक्रमाला मानाचा मुजरा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने हे राष्ट्र विक्रमाचे
हे राष्ट्र शांततेचे
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
आजचा दिवस आपल्या देशाच्या स्वाभिमानाचा आणि लोकशाहीचा
संविधानामुळे मिळालेल्या अधिकारांचा योग्य वापर करून
भारताला नव्या उंचीवर नेऊया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
या आपण नतमस्तक होऊ,
ज्यांच्यामुळे हा दिवस आपण पाहतो आहे,
नशीबवान आहे हे रक्त,
जे देशाच्या कामी आलं आहे,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सलाम करा या तिरंग्याला
जी तुमची शान आहे…
मान नेहमी वर उंच ठेवा
जो पर्यंत प्राण आहे…
जय हिंद, जय भारत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
बलसागर भारत व्हावे,
विश्वात शोभूनी राहावे,
भारतभूमीच्या तिरंग्याची शान कायम राहावी
हेच स्वप्न प्रत्येक भारतीयाने कायम पाहावे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
संविधानाच्या मूल्यांवर विश्वास ठेवत
एकता, समता आणि बंधुता जपूया
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशासाठी
काहीतरी सकारात्मक करण्याचा संकल्प करूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
“देशाचे रक्षण करणे हे फक्त सैनिकांचे काम नाही, ह्यासाठी पूर्ण देशाला मजबूत केले पाहिजे” – लाल बहादूर शास्त्री
भारताच्या संविधानाने आपल्याला ओळख दिली
अधिकार दिले आणि कर्तव्यांची जाणीव करून दिली
या अभिमानास्पद दिवशी सर्व भारतीयांना
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लोकशाही, स्वातंत्र्य आणि न्याय
या मूल्यांवर उभा असलेला
आपला भारत सदैव प्रगतीपथावर राहो
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
Republic Day 2026 : तिरंगा फडकवायचा, पण नियम माहिती आहेत का …
प्रजासत्ताक दिन हा फक्त उत्सव नसून
जबाबदारीची आठवण करून देणारा दिवस आहे
चला, संविधानाचा सन्मान करूया
देशासाठी प्रामाणिकपणे कार्य करूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!






