अक्षय्य तृतीयानिमित्त प्रियजनांना पाठवा खास मराठमोळ्या शुभेच्छा
हिंदू धर्मात वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा केल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेला खूप जास्त महत्व आहे. साडे तीन मुहूर्तांपैकी एक असणारा हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो. यादिवशी सोनं, चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मी, विष्णू आणि कुबेर यांची आवर्जून पूजा केली जाते. यंदा अक्षय तृतीया १९ एप्रिलला आहे. यादिवशी गृहप्रवेश, लग्न, नवीन घराची किंवा वाहनांची खरेदी इत्यादी अनेक शुभ गोष्टी केल्या जातात. तर घरात सुख, समाधान, शांतता लाभावी, अशी प्रार्थना सुद्धा केली जाते. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी नातेवाईकांना तुम्ही मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता.(फोटो सौजन्य – istock)
अक्षय्य तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर,
तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी
आणि समाधान अक्षय्य राहो
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
सुवर्णयोग घेऊन आली ही अक्षय्य तृतीया,
तुमच्या घरी येवो लक्ष्मी आणि लाभो सुख-शांतीची छाया
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे,
प्रगतीचे नवे मार्ग उघडू दे
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा!
मांगल्याचा सण, आनंदाची उधळण…
अक्षय्य तृतीया तुमच्या जीवनात घेऊन येवो सुवर्ण क्षण
घरामध्ये नांदो लक्ष्मी,
मनात वसूं दे समाधान,
अक्षय्य तृतीयेला मिळो तुम्हाला सुख-समृद्धीचे वरदान
ज्याप्रमाणे नावाला ‘अक्षय्य’ आहे,
तसाच तुमच्या आनंदातही कधीही क्षय न होवो
शुभ अक्षय्य तृतीया!
यशाची शिखरे सर करा,
स्वप्ने तुमची पूर्ण होऊ दे,
सोन्यासारख्या या दिवशी तुमचे आयुष्य उजळून निघू दे
आजचा हा सण तुमच्या आयुष्यात यशाचे नवे दालन उघडो,
आणि दुःखाचा अंधार कायमचा दूर होवो
शुभ अक्षय्य तृतीया!
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मनःपूर्वक शुभेच्छा
धन-धान्य आणि ऐश्वर्याने भरून जावो तुमचे घर,
अक्षय्य तृतीयेचा आनंद राहो तुमच्या आयुष्यावर निरंतर
लक्ष्मीचा वास असो,
गणेशाचा आशीर्वाद असो,
अक्षय्य तृतीयेचा सण तुमच्यासाठी खास असो!
गोड सांज, सुवर्ण क्षण,
अक्षय्य तृतीयेचे मंगलमय आगमन
आपणास सुखद आरोग्याची आणि समृद्धीची प्राप्ती होवो.
जुन्या आठवणींना उजाळा,
नव्या स्वप्नांना उभारी,
अक्षय्य तृतीया घेऊन आली सुखाची भरारी
या पवित्र दिवशी दान-धर्माचे फळ तुम्हाला लाभो
आणि ईश्वराची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहो
नाती असू दे अक्षय्य,
प्रेम असू दे अक्षय्य…
अक्षय्य तृतीयेच्या सोनेरी शुभेच्छा!
दिवसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसाय,
कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेम,
होत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षाव,
असा असो तुमचा अक्षय्य तृतीया सण!
साडेतीन मुहूर्तापैकी एक असा शुभदिन,
अक्षय्य तृतीयेला द्या शुभेच्छा खास,
आयुष्यात भरभरून येवो आनंद,
हेच आहे माझं मनापासून साकडं!
Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला लोक सोनं खरेदी का करतात? काय आहे यामागील धार्मिक महत्त्व
प्रत्येक काम सोपे होवो,
कोणतीही गोष्ट अपूर्ण न राहो,
जीवन ऐश्वर्य आणि प्रेमाने भरले जावो,
देवी लक्ष्मी दररोज घरात वास करो…
अक्षय्य तृतीयेचा सण तुम्हाला खास जावो!
उमा, रमा, ब्राह्मणी, तुच माता
चंद्रावर सूर्य प्रकाश होतो,
नारद मुनी गातात
जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता
अक्षय्य तृतीयेच्या सर्वांना शुभेच्छा !






