कमकुवत झालेली डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी 'या' भाज्या खाव्यात
शरीरातील सगळ्यात नाजूक अवयव म्हणजे डोळे. मात्र डोळ्यांचे आरोग्य बिघडल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. दैनंदिन जीवनात कामाचा वाढलेला तणाव, सतत मोबाईल किंवा लॅपटॉप घेऊन बसल्यामुळे डोळ्यांची दृष्टी कमकुवत होऊन होते. डोळ्यांची दृष्टी कमकुवत झाल्यानंतर डोळ्यांसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. कमी वयात डोळ्यांची दृष्टी कमकुवत झाल्यानंतर लहान मुलांना चष्मा लागतो. याशिवाय डोळ्यांमधून सतत पाणी येणे, मोतीबिंदू, काचबिंदू इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. डोळ्यांसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर डोळ्यांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित करा ‘या’ फळाचे सेवन, चवीसोबत आरोग्याला होतील अनेक फायदे
डोळ्यांचे बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी दैनंदिन आहारात पौष्टिक आणि शरीराला पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. डोळ्यांची कमकुवत झालेली दृष्टी सुधारण्यासाठी गाजर आणि पालक खावं. या भाज्या नियमित बाजारात उपलब्ध असतात. गाजर आणि पालकचे सेवन केल्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि आरोग्याला देखील फायदे होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गाजर आणि पालक खाल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
गाजर खाल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. डोळ्यांवर लागलेला चष्मा कायमचा काढून टाकण्यासाठी दैनंदिन आहारात गाजरचे सेवन करावे. यामध्ये बेटा-कॅरोटीन, विटामिन ए, इत्यादी अनेक घटक आढळून येतात. याशिवाय रातांधळेपणा आणि कमकुवत झालेली दृष्टी सुधारण्यासाठी नियमित गाजर खावे. गाजरमध्ये आढळून येणारे अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच रेटिनाच्या पेशींचे रक्षण करतात. त्यामुळे नियमित तुम्ही गाजर किंवा गाजरचा रस पिऊ शकता.
पालक ही भाजी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. पालक खाल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. याशिवाय सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही पालकपासून बनवलेल्या स्मूदीचे सेवन करू शकता. यामध्ये ल्यूटिन आणि झीएक्झँथिन नावाचे अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात, ज्यामुळे डोळ्यांचे हानिकारक पेशींपासून नुकसान होत नाही. पालकमध्ये असलेले विटामिन सी डोळ्यांच्या पेशी निरोगी ठेवतात. याशिवाय डोळ्यांमधील रक्तभिसरण सुधारण्यासाठी नियमित पालक खावे.
लहान मुलांसह मोठ्यांना शिमला मिरचीची भाजी खायला आवडत नाही. शिमला मिरचीचे नाव घेतल्यानंतर अनेक लोक नाक मुरडतात. मात्र असे न करता आठवड्यातून एकदा किंवा दोनदा शिमला मिरचीच्या भाजीचे सेवन करावे. यामध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे तुम्ही शिमला मिरचीचे भरीत किंवा भाजी बनवू शकता.
जेवणातील प्रत्येक पदार्थ बनवताना टोमॅटोच्या भाजीचे सेवन केले जाते. टोमॅटो खाल्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. यामध्ये असलेले लायकोपीन आणि विटामिन ए डोळ्यांना आवश्यक पोषण देतात. तसेच डोळ्यांच्या पेशींचे नुकसान होण्यापासून बचाव करतात. त्यामुळे आहारात पालक, गाजर, शिमला मिरची इत्यादी भाज्यांचे सेवन करावे.