लिंबू पाण्यात मध मिक्स करून पिणे या लोकांच्या आरोग्यासाठी ठरेल घातक
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून पितात. यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. वाढलेले वजन आणि पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मध आणि लिंबू पाण्याचे सेवन करतात. लिंबू पाण्यात अँटी-ऑक्सिडंट्स आणि इतर एन्झाईम्स शरीराला डिटॉक्सिफाई करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबू पाणी आणि मध मिक्स करून पितात, पण काही लोकांच्या आरोग्यासाठी हे पाणी घातक ठरते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून पिणे कोणत्या लोकांच्या आरोग्यासाठी घातक आहे, याबद्दल सांगणार आहोत. चला तयार जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: विटामीन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी सूर्यप्रकाशाव्यतिरिक्त ‘या’ फळांचे करा सेवन
किडनी स्टोनच्या त्रासामुळे आणि लोक त्रस्त आहेत. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास असलेल्या लोकांनी कोमट पाण्यात लिंबू मध मिक्स करून पिऊ नये. असे केल्यास किडनी स्टोनचा त्रास आणखीन वाढू शकतो. लिंबू पाण्यात असलेले सायट्रिक ऍसिड किडनीमधील कॅल्शियम ऑक्सलेटचे प्रमाण वाढू लागते आणि पोट दुखी वाढते.
ज्या व्यक्तींनी दातांच्या समस्या किंवा हिरड्यांसंबंधित कोणत्याही समस्या असतील अशांनी लिंबू पाण्यात मध मिक्स करून पिऊ नये. यामुळे दातांवरील मुलामा कमी होऊन जातो आणि दात कमकुवत होतात. लिंबामध्ये असलेले सायट्रिक असिड असल्यामुळे दातांवर पिवळा थर साचण्याची शक्यता असते.
हे देखील वाचा: साखरेचे अतिसेवन आरोग्यासाठी ठरेल हानिकारक, ‘ही’ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध
गॅस्ट्रिक अल्सरमुळे पोटात अल्सर निर्माण होण्याची शक्यता असते. लिंबू पाण्यात मध मिक्स करून प्यायल्यामुळे गॅस्ट्रिक अल्सरची समस्या वाढू लागते. तसेच मधातील उष्णता वाढल्यामुळे सुद्धा ही समस्या उद्भवू शकते. शिवाय पोटामध्ये अमल पित्ताची वाढ झाल्यामुळे सतत आंबट ढेकर येऊ लागतात. त्यामुळे लिंबू पाण्याचे सेवन करू नये.