फोटो सौजन्य: iStock
आजच्या धावपळीच्या जीवनात, प्रत्येकालाच स्वतःला निरोगी आणि उर्जेने परिपूर्ण ठेवायचे आहे. यासाठी योग्य पोषण आवश्यक आहे. अशावेळी अनेक जण ड्राय फ्रुट्सचे सेवन करत असतात. ड्राय फ्रुट्स आपल्या मेंदूला चालना देतात.
मेंदू हा केवळ आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग नाही तर तो आपल्या विचार करण्याची, समजून घेण्याची आणि काम करण्याची क्षमता देखील नियंत्रित करतो. अशा परिस्थितीत, त्याला योग्य पोषण मिळणे महत्वाचे आहे. बदाम आणि अक्रोड दोन्ही मेंदूसाठी खूप फायदेशीर आहेत, पण जेव्हा स्मरणशक्तीचा विचार केला जातो तेव्हा कोणता ड्रायफ्रूट जास्त प्रभावी आहे? अक्रोड की बदाम. चला या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात.
जन्मजात हृदय असतं बाहेर! काय आहे Ectopia Cordis? हार्टची अनोखी रचना; जाणून घेऊया संपूर्ण माहिती
अक्रोड आणि बदाम दोन्हीही निरोगी प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असतात. दोन्ही ड्राय फ्रुट भिजवल्यानंतर खाऊ शकता. अक्रोडमध्ये फॅटी अॅसिड 3 मोठ्या प्रमाणात असते, जे मेंदूसाठी चांगले असते. बदामांमध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात असते, जे स्नायू आणि मज्जासंस्थेच्या कार्यात मदत करते. मात्र, अक्रोडमध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल असतात, जे हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते, जे मेंदूची कार्यक्षमता वाढवते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की ओमेगा-3 मेंदूची स्मरणशक्ती, कार्यक्षमता वाढवते. अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने, ते जळजळ कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. तसेच चांगल्या पचनसंस्थेला आधार देते. मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने, ते कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते, त्यामुळे हृदय निरोगी राहते.
बदामांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, जे मेंदूसाठी खूप चांगले असते. बदामामध्ये असलेले मॅग्नेशियम मेंदूच्या आत माहितीचा योग्य प्रवाह होण्यास मदत करतेच, परंतु स्मरणशक्ती आणि मेंदूची एकाग्रता सुधारण्यासाठी देखील ते उत्कृष्ट मानले जाते. बदामांमध्ये प्रोटीन, फायबर, रिबोफ्लेविन (व्हिटॅमिन B12) आणि एल-कार्निटाइन सारखे घटक असतात, जे केवळ दीर्घकाळ एनर्जी प्रदान करत नाहीत तर मेंदूची क्रिया वाढविण्यास देखील मदत करतात.
‘कलेजी खाण्याच्या नादात त्याने काळीज फाडून खाल्ले…” कोकणातील ‘ती’ रात्र आणि चकवा
अक्रोड आणि बदाम दोन्ही मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, अँटिऑक्सिडंट पातळी आणि पॉलीफेनॉल भरपूर प्रमाणात असतात, जे मेंदूचे कार्य वाढवतात आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात. परंतु, जेव्हा दोन्ही ड्राय फ्रुट्सचा आहारात समावेश केला जातो तेव्हा शरीराला पोषक तत्वांचा मिश्रित डोस मिळतो. अशावेळी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.