Small Prawns Recipe : अनेक आगरी घरांमध्ये ओल्या करदीची भाजी आणि तांदळाची भाकरी हे काॅम्बीनेशन फार फेमस आहे. पारंपारिक मसाल्यात परतून या भाजीला खरपूस शिजेपर्यंत तयार केले जाते ज्यामुळे याची चव काही वेगळीच लागते. तुम्हाला मासे खायला आवडत असतील तर ही रेसिपी एकदा जरुर करुन पाहा.
(फोटो सौजन्य: Youtube)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
ओली करदी जिला स्माॅल प्राॅन्स असंही म्हटलं जातं.
याची सुक्की भाजी चवाला फार अप्रतिम लागते.
आगरी संस्कृतीत ही भाजी आवडीने खाल्ली जाते.
आगरी खाद्यसंस्कृतीत समुद्री खाद्यपदार्थांना विशेष स्थान आहे. त्यापैकी ओल्या करदीची आणि छोट्या कोळंबीची भाजी हा अतिशय चविष्ट आणि पारंपरिक पदार्थ मानला जातो. ताजी ओलसर करदी (लहान कोळंबी) आणि सुगंधी मसाल्यांचा अप्रतिम संगम या भाजीला वेगळीच चव देतो. ही भाजी तिखट, रसाळ आणि मसालेदार असल्यामुळे गरम भाकरी, तांदळाची भाकरी किंवा वाफाळलेल्या भातासोबत अप्रतिम लागते. घरगुती पद्धतीने कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही भाजी आगरी संस्कृतीतील अनेक घरांमध्ये आवर्जून केली जाते. तुम्ही फिश लव्हर्स असाल तर ही रेसिपीतुम्हाला पसंत पडेल याची आम्हाला खात्री आहे. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.