घरी देवाजवळ (god) सकाळ (morning) संध्याकाळ (evening) दिवा (lamp) लावण्याची परंपरा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. वेद शास्त्रात देवाजवळ तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. घरी दिवा लावण्याने घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होतं. घरात सकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो आणि घरातील वास्तु दोष समाप्त होतात. सरसो, तीळ, चमेलीच्या तेलाचा दिवा काही विशेष मुहूर्तावर लावला जातो. चला तर जाणून घेऊया दिवा तुमच्यासाठी कसा शुभ ठरू शकतो. घरा मध्ये दोन प्रकारचे दिवे लावले जातात. तेल आणि तुप चला तर मग जाणून घेऊ.
दिवा लावल्याने दूर होते नकारात्मक उर्जा (positive) , वास्तु शास्त्रानुसार घरी दिवा लावल्याने नेहमी सकारात्मक ऊर्जे सक्रिय होते. याबरोबर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, देवी देवतेला दिव्याचा प्रकाश विशेष आवडतो. पूजा करताना दिवा जाळणं शुभ मानल्या जातं.
तेल (oil) आणि तुपाच्या (butter) दिव्याचा फरक जाणून घ्या. तुपाचा दिवा हा देवी देवतेला समर्पित आहे. तर तेलाचा दिवा कोणाच्या ईच्छापूर्तीसाठी किंवा दोष दूर करण्यास लावला जातो. जर देवीला प्रसन्न करायचं असेल तर तुपाचा दिवा जाळा. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली होते. शनि दोष, साडे साती पासून मुक्तता मिळवण्यासाठी सरसोच्या तेलाचा दिवा जाळणं शुभ मानलं जातं. हनुमानाला प्रसन्न करायचं असेल तर चमेलीच्या तेलाचा दिवा जाळला जातो. आणि तीन वातीचा दिवा जाळावा. सूर्यदेव किंवा कालभैरवला प्रसन्न करण्यासाठी सरसोच्या तेलाचा दिवा जाळावा.
दिवा कोणत्या दिशेला असावा जाणून घेऊ, देवघरात तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताच्या दिशेत ठेवावा. तर तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताच्या दिशेला ठेवावा. आणि दिवा मध्येच विझू नये याची विशेष काळजी घ्यावी.