(फोटो सौजन्य – istock)
महागड्या उत्पादनांचा वापर
वर नमूद केल्या प्रमाणे अनेकजण आपल्या चेहऱ्याला सुंदर बनवण्यासाठी रासायनिक प्रोडक्टसचा वापर करतात खरं पण ते प्रत्येकवेळी आपल्या त्वचेसाठी योग्य असतील असे नाही. बाजारातील रासायनिक प्रोडक्ट्स अनेकदा त्वचेवर वाईट परिणाम करतात ज्यामुळे त्वचेच्या समस्या आणखी वाढू लागतात. यामुळे फोड येणे , लालसरपणा आणि सूज येणे यांसारख्या समस्यांना आमंत्रण मिळते. नैसर्गिक असल्याचा दावा केल्या जाणाऱ्या प्रोडक्ट्समध्येही बऱ्याचदा काही असे घटक मिसळलेले असतात जे आपल्या त्वचेला हानी पोहचवतात. अशावेळी आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही घरगुती उपायांची अधिक मदत घ्या. यात कोणतेही रसायन नसल्याने चेहऱ्यावर याचा वाईट परिणाम होत नाही.
उत्पादनांऐवजी काय करावे?
योगगुरु कैलाश बिश्नोई यांनी स्पष्ट केलं की, चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी आपण तुळशीच्या पानांचा वापर करु शकतो. त्यांच्या मते आरोग्याच्या आणि त्वचेच्या अनेक समस्या घरबसल्याच दूर करता येऊ शकतात. आजकाल जवळजवळ सर्वांच्याच घरी तुळशीची रोपे पाहायला मिळतात. अन्यथा आपल्या शेजाऱ्यांच्या घरी तर तुम्हाला नक्कीच हे रोप मिळून जाईल. तुळशीचे पाने फक्त त्वचेसाठीच नाही तर आरोग्यासाठीही अनेक पटींनी फायदेशीर ठरतात. याच्या मदतीने त्वचेवरील समस्या दूर करायचे असल्यास प्रथम तुळशीची पाने मिक्सरमध्ये फिरवून याचा रस तयार करा. पाने पूर्णपणे पिळून रस काढा. तयार रस दररोज रात्री त्वचेवरील मुरुमांवर लावा आणि सकाळी चेहरा धुवा. याच्या मदतीने चेहरा हळूहळू साफ होईल. तुम्ही तुळशीच्या पानांचा रस बर्फाच्या ट्रेमध्ये टाकून रोज एक ते दोन बर्फ देखील मुरुमांवर चोळू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






