आपला कोणताही लूक हा फक्त कपड्यांनीच नाही तर त्यासोबतच त्यांना साजेसे असे दागिने घातल्याने पूर्ण होत असतो. दागिने अनेकदा सौंदर्यात भर पाडण्यात नमदत करतात असतात. दागिन्यांचे सौंदर्य म्हणजेच त्यांवर कोरलेले नक्षीकाम बघून अनेकदा थक्क व्हायला होते. बाजारात अनेक वेगेवेगळ्या प्रकारचे दागिने उपलब्ध असतात. आपला कोणताही लूक हा दागिन्याशिवाय अपुराच पडतो. अनेकदा दागिन्यांची किंमत इतकी अफाट असते की, महिलांना ते खरेदी करणे परवडत नाही. तसेच तीच तीच जुनाट डिजाईन पाहूनही दागिने न खरेदी करण्याचा विचार मनात येत असतो.
आम्ही तुम्हाला सांगतो की, मुंबईत अशी एक जागा आहे जिथे तुम्हाला अगदी वाजवी दरात सुंदर आणि नव्या डिझाइनचे दागिने उपलब्ध होतील. आज आम्ही तुम्हाला मुंबईमधील अशा काही ठिकाणांविषयी सांगणार आहोत, जेथे सुंदर आर्टिफिशियल दागिने अगदी कमी दरात उपलब्ध होतात.
[read_also content=”कमी बजेटमध्ये करा तमिळनाडूच्या सौंदर्याचे दर्शन, IRCTC ने शेअर केले अप्रतिम पेकेजेस https://www.navarashtra.com/lifestyle/explore-the-beauty-of-tamil-nadu-on-a-low-budget-irctc-shares-amazing-packages-539915.html”]
कोलाबा कॉजवे
कोलाबा कॉजवे हे मुंबईतील एक लिकप्रिय मार्केट आहे. इथे नेकल्सपासून ते बांगड्यांपर्यंत सगळ्या प्रकारचे दागिने उपलब्ध आहेत. पॉकेटफ्रेंडली दागिन्यांच्या शोधात असाल तर या मार्केटला भेट द्यद्यला विसरू नका. हे मार्केट चर्चगेट स्टेशनपासून कोलाबा मार्केट फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे.
हिल रोड
हिल रोडदेखील एक उत्तम पर्याय आहे. इथे मुख्यतः कपड्यांच्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र इथे उत्तम दर्जाचे दागिनेदेखील उपलब्ध असतात. इथे तुम्ही ऑक्सिडाइज्डचे दागिने खरेदी करू शकता. ऑक्सिडाइज्ड दागिन्यांबरोबरच तुम्हाला इथे इतर दागिनेही उपलब्ध होतील. वांद्रे स्थानकापासून हे मार्केट जवळ आहे. इथे जायला तुम्हाला स्टेशनपासून २० मिनिटे लागतील.
लिंकिंग रोड
लिंकिंग रोड हे वांद्रे स्थानाकाजवळ असून दागिन्यांच्या खरेदीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. इथे तुम्हाला सर्वच प्रकारचे दागिने मिळतील त्याचबरोबर इथे वेस्टर्न कपड्यांचेदेखील ऑप्शन आहे. इथे जाण्यासाठी वांद्रे स्थानकापासून रिक्षा करावी लागते.
भुलेश्वर
भुलेश्वर हे खरेदीसाठीचे एक लोकप्रिय ठिकाण असून सणांच्या दिवशी इथे फार गर्दी पाहायला मिळते. भुलेश्वर हे एक जुने मार्केट असून अजूनही तेवढ्याच चर्चेत आहे. विशेषतः लग्नाची खरेदी करण्यासाठी तुम्ही इथे जाऊ शकता. पारंपरिक दागिन्यांपासून ते वेस्टर्न दागिन्यांपर्यंत तुम्हाला इथे सर्वच काही उप्काब्ध मिळेल, त्यामुळे एकदा तरी या जागेला भेट द्यद्यला विसरू नका.






