तांदळाच्या पाण्यात आहे सौंदर्याचा खजिना!
आपली त्वचा कायम सुंदर, तेजस्वी, गोरीपान, चमकदार असावी, असे प्रत्येक महिलेले नेहमीच वाटत असत. सुंदर त्वचेसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी फेशिअल करून घेतले जाते तर कधी सुंदर त्वचेसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. मात्र बऱ्याचदा चुकीच्या प्रकारचे स्किन केअर प्रॉडक्ट वापरल्यामुळे त्वचा अतिशय निस्तेज आणि काळवंडलेली वाटू लागते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणत्याही केमिकलयुक्त स्किन केअर प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी तांदळाच्या पाण्याच वापर करावा. तांदळाच्या पाण्यात असलेले गुणधर्म त्वचा कायम हायड्रेट आणि सुंदर ठेवण्यासाठी मदत करतात.(फोटो सौजन्य – iStock)
तांदळाच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि अमीनो अॅसिड्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे त्वचेसंबंधित कोणतीही समस्या उद्भवू लागल्यास तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. तांदळाचे पाणी त्वचा कायम हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. कोरियन महिलांप्रमाणे सुंदर आणि गोऱ्यापान त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. तांदळाचे पाणी तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला तांदळाचे पाणी तयार कसे करावे? तांदळाच्या पाण्याचे त्वचेला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
तांदळाचे पाणी तुम्ही कोणत्याही प्रकारे वापरू शकता. तांदळाच्या पाण्यापासून बनवलेले आईस क्यूब दीर्घकाळ टिकून राहतात. यासाठी वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्यात पाणी घाला आणि ३ वेळा तांदूळ स्वच्छ धुवा. त्यानंतर तांदळामध्ये पाणी घालून तांदूळ रात्रभर भिजत ठेवा. तांदूळ भिजल्यानंतर पाण्यासहीत टोपात ओतून त्यात थोडस पाणी घालून शिजवून घ्या. त्यानंतर त्यात पाणी गाळून थंड करा. आईस ट्रेमध्ये तयार केलेले पाणी ओतून बर्फ तयार होण्यासाठी ठेवा. तयार केलेला बर्फ तुम्ही नियमित चेहऱ्यावर फिरवू शकता.
तांदळाचे पाणी सर्वच त्वचा प्रकारासाठी अतिशय प्रभावी आहे. या पाण्यात असलेले गुणधर्म त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. याशिवाय त्वचा हायड्रेट राहते. तांदळाच्या पाण्यात जीवनसत्व B आणि E, फेर्युलिक अॅसिड, इनोसिटोल आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे रात्री झोपण्याआधी किंवा सकाळी उठल्यानंतर त्वचेवर तुम्ही बर्फ फिरवू शकता. यामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होईल. तसेच त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारेल. त्वचेचे पीएच संतुलित राखण्यासाठी तांदळाचे पाणी मदत करते. यामुळे चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी होतो.
केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘हे’ हेअरमास्क ठरतील प्रभावी, केस होतील चमकदार
वाढत्या वयात चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. हे पाणी त्वचा हायड्रेट ठेवण्यासोबतच निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा मदत करेल. त्वचेवर वाढलेल्या बारीक रेषा, सुरकुत्या किंवा वाढत्या वयातील खुणा कमी करण्यासाठी तांदळाचे पाणी वापरावे. हे पाणी लावल्यामुळे त्वचेमध्ये घट्टपणा येतो.