फोटो सौजन्य: Freepik
आपले केस तरुण वयातच झडणे यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय. काहींची केसं तरुण वयात झडतात तर काहींची उतारवयात. पण जेव्हा केसं झडण्यास सुरुवात होते, तेव्हा कुठेतरी आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो. खरंतर प्रत्येकालाच वाटते की आपली केसं ही नेहमीच बहारदार राहावीत पण नकळत आपल्याकडून काही चुका होतात ज्यामुळे आपली केसं गळायला लागतात. चला या चुकांबद्दल जाणून घेऊया.
ओल्या केसांना कंगवा केल्याने केसांचे किती नुकसान होते हे तुम्हाला माहिती आहे का? ही एक अशी सवय आहे जी आपल्याला लहानपणापासूनच असते, परंतु ती आपल्या केसांसाठी अत्यंत हानिकारक असू शकते. केस धुतल्यानंतर केसांचे फोलिकल्स थोड्या काळासाठी मऊ होतात. अशा परिस्थितीत कंगवा केल्यास केस सहज तुटू लागतात आणि त्यांची मुळेही कमकुवत होतात.
हे देखील वाचा: पांढरे केस काळे करण्यासाठी बीटच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केस होतील काळेभोर
जास्त केस धुतल्याने स्कॅल्प कोरडी होऊ शकते आणि तुम्हाला कोंड्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागू शकते. आपल्या केसांच्या मुळांमधून एक नैसर्गिक तेल निघते जे केसांना मॉइश्चरायझ ठेवण्यास खूप मदत करते, परंतु जेव्हा आपण जास्त प्रमाणात शॅम्पू करू लागतो तेव्हा हे तेल निघून जाते आणि केस कोरडे आणि निर्जीव होतात. परिणामी ते गळायला लागू शकतो.
ओले केस खूप नाजूक असतात. ते अगदी थोडा निष्काळजीपणा देखील सहन करू शकत नाहीत. बरेच लोक वेळ वाचवण्यासाठी ड्रायरने ओले केस सुकवतात, पण तुम्हाला माहित आहे का की ही सवय तुमच्या केसांना खूप नुकसान पोहोचवू शकते. ड्रायरच्या उष्णतेमुळे केसांमधील ओलावा निघून जातो, ज्यामुळे केस कोरडे होतात आणि तुटायला लागतात.
अनेकदा आपण केसांच्या काळजीकडे लक्ष देतो, पण कंगवा आणि स्टाइलिंग टूल्सच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो. ही एक मोठी चूक आहे. कंगवा आणि ब्रशवर साचलेली घाण, तेल, कोंडा आणि इतर मृत त्वचा तुमच्या केसांना अनेक समस्या निर्माण करू शकते.
केसांची काळजी घेण्यासाठी शतकानुशतके तेल वापरले जात आहे, परंतु जर आपण ते लावणे टाळले तर त्यामुळे तुमच्या केसांना चांगले नुकसान होऊ शकते. केसांना तेल न लावल्याने केस कोरडे आणि निर्जीव होतात. लक्षात ठेवा की कोरड्या केसांमध्ये कोंड्याची समस्या देखील वाढते. ज्यामुळे केस गळणे एक सामान्य समस्या बनते.