बदलत्या जीवनशैलीनुसार संतुलित आहार घेणे फार गरजेचे असते. यासाठी ड्रायफ्रुटसचा आहारात समावेश करणे फायद्याचे मानले जाते. ड्रायफ्रुट्समध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक आढळली जातात, जे आपल्या आरोग्याला नारोजी ठेवण्यास मदत करत असतात. अनेकदा शरीराच्या तंदुरुस्थीसाठी ड्रायफ्रुटसचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टरांद्वारे केला जातो.
अनेकदा ड्रायफ्रुटस म्हटलं की फक्त काजू, बदाम आणि पिस्ता आठवला जातो. मात्र तुम्हाला माहित आहे का यांव्यतीरिक्त आणखीन एक ड्रायफ्रुट आहे, जे तितकेच प्रभावी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या ड्रायफ्रुटचे नाव आहे चिलगोजा. बाकींप्रमाणेच हादेखील एक सुकामेव्याचा प्रकार आहे. अनेकांनी चिलगोजाचे नाव ऐकले नसावे. हे पाइन झाडाच्या फळाच्या आत असलेले बी आहे. चिलगोजा पौष्टिकतेने समृद्ध आहे. चिलगोजाला ‘पाइन नट्स’देखील म्हणतात. हे अत्यंत महाग ड्रायफ्रुट आहे. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळेच बाजारात त्याची मागणी जास्त आहे. चिलगोजाचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला कोणते फायदे मिळतात, या विषयावर आहारतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
चिगोज हे एक सुपरफ्रुट आहे. शरीरात प्रथिने आणि जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास डॉक्टरांद्वारे याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. चिलगोजा हा प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वांचा एक उत्तम स्रोत आहे. याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होत असतात. याच फायद्यांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
[read_also content=”बाग हिरवीगार करण्यासाठी केळीची साल उपयुक्त, कसा वापर करावा? तज्ज्ञांकडून जाणून घ्या https://www.navarashtra.com/lifestyle/how-to-use-banana-peel-for-greening-the-garden-learn-from-the-experts-541626.html”]
हेल्दी फॅट्स
चिलगोज्यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण भरपूर असते, जे तुमच्या हृदयासाठी फायदेशीर असते
प्रथिने
चिलगोजामध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे शाकाहारींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे
फायबर
चिलगोजामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि निरोगी चरबीचा चांगला स्रोत आहे. तसेच यात मुबलक प्रमाणात फायबर आढळली जातात
जीवनसत्त्वे आणि खनिजे
चिलगोजामध्ये मॅग्नेशियम असते जे हाडे मजबूत ठेवण्यास करत असतात. यात व्हिटॅमिन ई देखील आढळले जाते, जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते
चिलगोजाचे सेवन करणे फायदेशीर
कोलेस्ट्रॉल कमी करते
चिलगोजामध्ये टोकोफेरॉल नावाचे अँटीऑक्सिडंट आढळते, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल दूर करण्यास मदत करते आणि हृदयरोगापासून बचाव करते
वजन नियंत्रणात राहते
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. वास्तविक यात लोह आणि प्रथिनांचे प्रमाण अधिक असते, जे भूक करण्यास मदत करतात.
रोगप्रतिकारकशक्ती सुधारते
रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याची आणि अनेक आजरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी चिलगोजाचे सेवन फायदेशीर ठरते. मात्र याचे सेवन कारण्यापूर्वी तुम्हाला याची ऍलर्जी तर नाही ना ते तपासून घ्या.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.