जिम करताना केलेल्या 'या' चुका शरीरासाठी ठरतील अतिशय घातक
जिम करताना केलेल्या कोणत्या चुका शरीरासाठी घातक ठरतात?
वजन कमी करण्यासाठी कोणत्या टिप्स प्रभावी?
वजन वाढण्याची कारणे?
जगभरात वाढलेले वजन आणि लठ्ठपणामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. शरीरावर चरबीचा अनावश्यक थर साचून राहिल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. यामुळे झपाट्याने वजन वाढू लागते. याशिवाय आरोग्यासंबंधित गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी आहारात प्रयत्न केले जातात. कधी डाएट तर कधी महागड्या सप्लिमेंट्सचे सेवन केले जाते. यामुळे वजन कमी होते पण शरीराच्या नाजूक अवयवांना इजा पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन कमी करताना कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन करू नये. वजन कमी करण्यासाठी किंवा वजन वाढवण्यासाठी अनेक लोक जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करतात. पण चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यास शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतात. (फोटो सौजन्य – istock)
सध्या प्रत्येकाचे आयुष्य धावपळीचे झाले आहे. सेलिब्रिटींचा विचार केला तर आपल्यापेक्षा त्यांचे लाइफ खूपच बिझी आहे. तरी ते काहीही करून वेळात वेळ काढून आपले फिटनेस टिकविण्यासाठी रोज वर्कआउट करतातच. त्यांचेच अनुकरण करून आपणही आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढतो आणि जिममध्ये जातो. मात्र बऱ्याचदा जिममध्ये वर्कआउट करताना किवा त्यानंतर आपण अशा काही चुका करतो त्यामुळे आपण अपेक्षित फायदा मिळण्याऐवजी नुकसानच जास्त होते.
शरीरात लवकर बदल घडविण्यासाठी बरेचजण वर्कआउटनंतर सप्लीमेंट घेणे सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र असे करणे आरोग्यासाठी खूपच घातक ठरू शकते. सप्लीमेंट आरोग्यासाठी चांगले नसल्याने त्याऐवजी अन्य हेल्दी फूडला प्राधान्य द्यावे.
जिममध्ये एक्झरसाइजची सुरुवात कार्डियोने करावी, मात्र वर्कआउट केल्यानंतर कधीही कार्डियो एक्झरसाइज करू नये. वर्कआउटची सुरुवात कार्डियो एक्झरसाइजने केल्यास त्यानंतर रेग्युलर एक्झरसाइज करावी.
जिममध्ये वर्कआऊट केल्यानंतर प्रोटीनचे सेवन करणे फायदेशीर असते. मात्र वर्कआउट केल्यानंतर चुकूनही कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचे सेवन करू नये. यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.
बऱ्याचदा वर्कआउट केल्यानंतर शरीरात वेदना होतात. त्यापासून आराम मिळण्यासाठी स्ट्रेचिंग करणे खूपच फायदेशीर ठरते, वर्कआउट केल्यानंतर किया कार्डियो एक्झरसाइज केल्यानंतर स्ट्रेचिंग करावे. यामुळे वर्कआउट संपल्यानंतर शरीरातील वेदनांपासून आराम मिळतो.
बरेच जण वर्कआउट केल्यानंतर किती कॅलरी बर्न झाल्या आहेत, या हिशोबाने जंक फूड किंवा अन्य पदार्थ सेवन करतात, जे योग्य नाही. यामुळे शरीरात फॅट वाढू शकते.
एक्झरसाइज संपल्यानंतर शरीरात इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता पूर्ण करण्यासाठी स्पोर्ट्स ड्रिंकचे सेवन शरीरासाठी अयोग्य आहे. स्पोर्टस ड्रिंकने शरीरात इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता तर दूर होते मात्र यात शुगर असल्याने अतिरिक्त कॅलरीज शरीरात जमा होतात. त्याऐवजी नारळ पाणी घेतल्यास फायदेशीर ठरेल.
Ans: केवळ फॅन्सी असल्यामुळे जिम निवडू नका, तर तिथे असलेल्या सुविधा आणि प्रशिक्षकांबद्दल चौकशी करा.
Ans: व्यायाम करताना मोबाईलवर बोलणे, मेसेज पाहणे किंवा गेम खेळणे टाळा. यामुळे तुमचा वेळ जातो आणि व्यायामाच्या परिणामांवरही परिणाम होतो.
Ans: तुमच्या शारीरिक क्षमतेवर आणि ध्येयांवर अवलंबून असते. याबद्दल ट्रेनरचा सल्ला घ्या.






