फोटो सौजन्य: Freepik
हार्ट अटॅक ही एक अशी समस्या आहे जी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जर वेळीस या समस्येकडे लक्ष दिले नाही तर हा आजरा आपल्या जीवावर बेतू शकतो. बदलती लाइफस्टाइल आणि आपला चुकीचा आहार या आजाराला मुख्य कारणीभूत जरी असला तरी बालपणी काही समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा आजार वाढू शकतो.
एका नवीन संशोधनात धक्कादायक खुलासा झाला आहे की बालपणात आणि पौगंडावस्थेतील उच्च रक्तदाबामुळे प्रौढावस्थेत हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारखे गंभीर धोके चार पटीने वाढू शकतात. हे संशोधन 1996 ते 2021 दरम्यान कॅनडातील ओंटारियो येथील 25,605 मुले आणि किशोरवयीन मुलांवर करण्यात आले, ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या होती.
हे देखील वाचा: अचानक एखाद्या व्यक्तीस Heart Attack आल्यास काय करावे? ‘हा’ उपाय वाचवेल प्राण
संशोधकांना असे आढळून आले की ज्यांना लहानपणापासूनच उच्च रक्तदाबाचा त्रास होता, त्यांना हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका अन्य लोकांच्या तुलनेत दोन ते चार पट जास्त असतो. हे संशोधन कमी वयात उच्च रक्तदाब नियंत्रित करणे आणि त्याचे धोके कमी करण्याचे महत्त्व अधोरेखित करते.
बालपणातील उच्च रक्तदाबाचा गंभीर परिणाम: संशोधनातून असे दिसून आले आहे की बालपणातील उच्च रक्तदाबाचा पुढे प्रौढ जीवनावर वाईट परिणाम होतो आणि हा हृदयविकाराचा एक प्रमुख घटक आहे.
हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो: अभ्यासात आढळलेल्या मुलांपैकी ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता त्यांना मोठे झाल्यावर हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक किंवा हृदयावरील शस्त्रक्रिया होण्याचा धोका दोन ते चार पट अधिक असल्याचे दिसून आले.
त्यामुळे या लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये उच्च रक्तदाब लवकर ओळखणे आणि त्यावर उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पालकांनी मुलांच्या आरोग्याबाबत जाणकार राहून त्यांच्या आरोग्याची नियमितपणे तपासणी केली पाहिजे. तुमच्या मुलांमध्ये उच्च रक्तदाबाची लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.