शरीरातील रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर पायांमध्ये दिसू लागतात 'ही' गंभीर लक्षणे
चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढलेले तणाव, अतितिखट किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन, धूम्रपान, व्यायामाचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांसह संपूर्ण शरीराच्या रक्तवाहिन्यांना अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात किंवा आरोग्यामध्ये होणाऱ्या छोट्या मोठ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता शरीराला पचन होणाऱ्या हलक्या आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीराला कोणतेही हानी पोहचत नाही. शरीराच्या रक्तवाहिन्या संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम करतात.(फोटो सौजन्य – iStock)
मानवी शरीरात असलेल्या रक्तवाहिन्या ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्वे शरीराच्या प्रमुख अवयवांकडे पोहचवण्याचे काम करतात. मात्र शरीरात वाढलेल्या कोलेस्टरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे बऱ्याचदा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. संपूर्ण शरीराच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर सकाळी उठल्यानंतर पायांमध्ये गंभीर लक्षणे दिसून येतात. पायांमध्ये दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.
रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर शरीराच्या कार्यात आणि रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. शरीरात निर्माण होणाऱ्या या अडथळ्यांमुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊन जातात. याशिवाय शरीरात मोठे बदल दिसू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीराच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर पायांमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये आणि इतर भागांमध्ये अनावश्यक चरबी जमा होण्यास सुरुवात होते. पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा झाल्यानंतर रक्तवाहिन्या पूर्णपणे ब्लॉक होऊन जातात. धुम्रपान, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि अनियंत्रित रक्तातील साखरेची पातळी इत्यादी गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.