मुंबई : सध्याच्या युगात स्मार्टफोन वापरणं हे फार मोठं टास्क नाही. मात्र तरीही अशा काही टीप्स वापरल्या किंवा हॅक्स केले तर मोबाईल वापरणं आणखीनचं सोपं होईल. तसेच अनेक वृद्ध व्यक्तींना आताही मोबाईल वापरणं कठीण जातं. त्यांना याचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.
पहिली टीप म्हणजे, जर तुम्ही मोबाईल फोनचे स्क्रीन-रोटेट फंक्शन नेहमी चालू ठेवत असाल तर आता ते करणे थांबवा. ते चालू ठेवल्याने एक्सलेरोमीटर नावाचा विशेष सेन्सर वापरला जातो जो फोनची बॅटरी जास्त वापरतो आणि त्यामुळे बॅटरी लवकर संपते. म्हणूनच जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच स्वयं-रोटेट फंक्शन वापरा.
नवीन फिल्टर वापरून पहा हे थोडं विचित्र आहे, परंतु ते वापरून पहा. फोटो काढताना प्रकाश खूप उजळत असल्यास, सनग्लासेसवर फोनच्या कॅमेऱ्याने फोटो घ्या. यामुळे चित्र तर सुंदर तर होईलच, पण जास्त प्रकाशाच्या समस्येपासूनही सुटका मिळेल.चांगला ऑडिओ मिळवास्मार्टफोनच्या साहाय्याने व्हिडिओ बनवताना आजूबाजूचे अनेक आवाजही रेकॉर्ड केले जातात, जे ऐकायला चांगले वाटत नाहीत. ही समस्या टाळण्यासाठी, तुम्ही मायक्रोफोन कव्हर करून तुमच्या व्हिडिओंची ऑडिओ गुणवत्ता सुधारू शकता. ही युक्ती पार्श्वभूमीचा आवाज कमी करते ज्यामुळे तुम्ही मुख्य ऑडिओ प्रवाह अधिक चांगल्या प्रकारे ऐकू शकता.
व्हिडिओ बनवताना मायक्रोफोन कव्हर करण्यासाठी फक्त एक बोट वापरा.फोन रीस्टार्ट करातुमचा स्मार्टफोन सुरळीत चालू ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान 3 वेळा रीस्टार्ट करा. अशा प्रकारे अॅप्स रीसेट होतील आणि स्मार्टफोनला ब्रेक मिळेल. कधी कधी फोन जास्त हँग होतो. अशा परिस्थितीत फोन रीस्टार्ट करणे देखील चांगले.






