निरोगी गर्भधारणा आणि बाळाच्या पोषणासाठी आवश्यक ठरतात 'ही' जीवनसत्वे
प्रत्येक महिलेसाठी आई होणे ही जगातील सगळ्यात सुंदर भावना आहे. गरोदरपणात सर्च महिला बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आहारात बदल करणे, शरीराला आवश्यक असलेली पुरेशी झोप, खाण्यापिण्याच्या सवयी इत्यादी सर्वच गोष्टींवर व्यवस्थित लक्ष दिले जाते. आईच्या गर्भात बाळाचे सर्व अवयव तयार होतात. त्यामुळे बाळाच्या पोषणासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध आणि आहारात बदल करून शरीराला आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते.(फोटो सौजन्य – iStock)
गर्भधारणा व निरोगी गरोदरपणामध्ये पोषण महत्वपूर्ण भूमिका बजावते. समतोल आणि पोषणसमृद्ध आहारामुळे गर्भधारणेची संभाव्यता वाढते आणि गर्भाच्या विकासासाठी तसेच मातेच्या स्वास्थ्यासाठी हा आहार उपयुक्त ठरतो. बाळ आणि आई दोघांमधील दीर्घकालीन निष्पत्तीवर आहाराचा प्रभाव असतो. ही माहिती डॉ. प्रियांका शहाणे, फर्टिलिटी स्पेशॅलिस्ट, बिर्ला फर्टिलिटी अॅण्ड आयव्हीएफ, नागपूर यांनी दिली आहे.
गर्भाच्या विकासात मदत – अत्यावश्यक पोषकांचे पुरेसे सेवन केल्यास गर्भाच्या वाढीत तसेच इंद्रिय विकासात मदत होते.
गरोदरपणातील गुंतागूंती कमी होतात – गर्भारावस्थेतील मधुमेह, प्रीएक्लम्शिया (गरोदरपणात रक्तदाब वाढण्याची अवस्था), अशक्तपणा, वजन अति वाढणे आदींचा धोका पोषक आहारामुळे कमी होतो. या आजारांचा माता व बाळ दोघांवर वाईट परिणाम होऊ शकतो.
मातेच्या आरोग्यात सुधारणा चांगल्या पोषणामुळे मातेची रोगप्रतिकार यंत्रणा सशक्त होते, त्यामुळे प्रादुर्भावांचा धोका कमी होतो आणि प्रसुतीनंतर प्रकृती पूर्वपदावर येण्यात मदत होते.
बाळात दोष निर्माण होण्याचा धोका कमी होतो – बाळाच्या न्युरल ट्युबच्या (गर्भाचा मेंदू व मज्जारज्जू ज्यापासून तयार होतो ती पोकळ नळी) विकासासाठी फॉलिक ऍसिडचा आवश्यक त्या प्रमाणात ग्रहण केले गेले पाहिजे. गर्भधारणेसाठी तसेच निरोगी पद्धतीने गर्भ टिकवून धरण्यासाठी स्त्रियांच्या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, हलकी प्रथिने (लीन प्रोटिन), आरोग्यकारक मेद आणि दुधाच्या पदार्थांचा समावेश करणे अत्यावश्यक आहे. पुढील पोषके आहारातून घेण्यावर त्यांनी भर दिला पाहिजे.