शरीरात वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात 'हे' घरगुती उपाय केल्यास तात्काळ मिळेल आराम
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात सतत होणारे बदल, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, अतिप्रमाणात जंक फूड, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होण्यास सुरुवात होते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. शरीरात उच्च रक्तदाब वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. प्रमाणापेक्षा जास्त रक्तदाब वाढल्यानंतर रक्तवाहिन्या फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षाच्या ३०० दिवस करतात मखाणाचे सेवन! जाणून घ्या पोषणयुक्त मखाणाचे फायदे
उच्च रक्तदाब वाढल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे, अन्यथा जीवाला हानी पोहचू शकते. उच्च रक्तदाबासारख्या गंभीर आजारामुळे हृदय, मेंदू, मूत्रपिंड आणि इतर अवयवांचे नुकसान होऊ शकते.मानसिक तणाव, कामाचा ताण, शारीरिक हालचालींचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे उच्च रक्तदाब वाढू लागतो. वाढलेला रक्तदाब नियंत्रणात करण्यासाठी डॉक्टरांच्या गोळ्या औषधांसोबतच लिंबू पाण्याचे सेवन करावे. लिंबू पाण्यात विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तदाबाची समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. रक्तदाब वाढल्यानंतर लगेच लिंबू पाण्याचे सेवन केल्यास तात्काळ आराम मिळेल.
उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी दैनंदिन आहारात बदल करून शरीराला पचन होईल अशाच पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाबाची समस्या कायमची दूर करण्यासाठी आहारात जंक फूड खाण्याऐवजी घरी बनवलेले निरोगी आणि पौष्टिक अन्नपदार्थ खावेत. संपूर्ण धान्य, फळे, भाज्या, कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे आणि काजू इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांमध्ये आढळून येणारे घटक शरीरासाठी आवश्यक आहेत. याशिवाय आहारात कमी गोड पदार्थांचे सेवन करणे टाळावे.
उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवण्यामागे असलेले प्रमुख कारणं म्हणजे वाढलेले वजन. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. शरीरात उच्च रक्तदाब वाढल्यासारखे वाटल्यास तातडीने कोमट पाण्याची अंघोळ करावी. कोमट पाण्याने अंघोळ केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहील. कोमट पाणी थकवा आणि तणाव कमी करण्यासाठी मदत करतो.