आंब्याची कुयरी फेकून न देता चमकदार त्वचेसाठी बनवा घरीच बनवा बॉडी बटर
उन्हाळाच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबे उपलब्ध असतात.हापूस आंब्यांचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. चवीला गोड आणि रसाळ आंबे सगळ्यांचं खूप आवडतात. आंबे खाल्यानंतर आंब्यांच्या आतील कुयरी फेकून दिली जाते. आंबा खाताना आंब्याची कुयरी व्यवस्थित खाल्ली जाते. आंबा खाल्यानंतर कुयरी फेकून देण्याऐवजी त्यापासून तुम्ही स्किन केअर प्रॉडक्ट तयार करू शकता. उन्हाळा वाढल्यानंतर जास्त वेळ उन्हात गेल्यामुळे त्वचा अतिशय कोरडी आणि काळवंडून जाते. काळी झालेली त्वचा पुन्हा उजळ्वण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर केला जातो. मात्र त्वचेला सूट न होणाऱ्या प्रॉडक्टचा वापर त्वचेसाठी अजिबात करू नये.
कडक उन्हाळ्यात त्वचेची आद्रता आणि ओलावा टिकवून ठेवण्यासाठी बॉडी वॉश किंवा बॉडी बटचा वापर केला जातो. यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो. पण बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा घरगुती पदार्थांपासून सोप्या पद्धतीमध्ये बॉडी बटर तयार करावे. नैसर्गिक पदार्थांचा वापर करून बनवलेले बॉडी बटर त्वचा कायम सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी मदत करते. वाढत्या उन्हाळ्यात केमिकल्सयुक्त मॉइश्चरायझर किंवा बॉडी बटर लावण्यापेक्षा घरी बनवलेल्या बॉडी बटरचा वापर करावा.
आंब्याची क्युरी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. यामध्ये विटामिन सी, विटामिन ई, प्रोटीन, जिंक, पोटॅशियम, कॅल्शियम मिनरल्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची योग्य काळजी घ्यावी. या दिवसांमध्ये त्वचा अतिशय तेलकट किंवा चिकट होऊन जाते. चिकट झालेली त्वचा सुधारण्यासाठी योग्य स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करावा. उन्हाळ्यात फंगल इंन्फेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी त्वचा योग्य पद्धतीने स्वच्छ करावी.
उन्हाळ्यात केस सतत गळतात? केसांच्या वाढीसाठी ‘या’ तेलाचा नियमित करा वापर, केस होतील मजबूत
आंब्याच्या कुयरीपासून बॉडी बटर तयार करण्यासाठी आंब्याचा सगळं गर चमच्याने काढून घ्या. त्यानंतर त्याच्या आतील पांढरा भाग सुरीच्या सहाय्याने काढा. त्यातील पांढऱ्या रंगाची बी किसणीच्या सहाय्याने किसून घ्या. त्यानंतर भांड्यात तयार शिया बटर आणि खोबरेल तेल एकत्र मिक्स करून गॅसवर मंद आचेवर ठेवून द्या. त्यानंतर त्यात बारीक किसून घेतलेली आंब्याच्या कुयरी टाकून मिक्स करा. तयार करून घेतलेले मिश्रण थंड झाल्यानंतर काचेच्या डब्यात भरून ठेवा. हे बॉडी बटर नियमित अंगाला लावल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होईल.